Viral Video: सलमान खानच्या गाण्यावर पती- पत्नीने केला धम्माल डान्स, अभिनेत्री म्हणाली- 'हाहाहा ये तो...'

Viral Video: सलमान खानच्या गाण्यावर पती- पत्नीने केला धम्माल डान्स, अभिनेत्री म्हणाली- 'हाहाहा ये तो...'

लोकांना त्यांचा हा परफॉर्मन्स फार आवडत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही या डान्सचं कौतुक केलं आहे.

  • Share this:

सलमान खान आणि भाग्यश्रीचा 'मैंने प्यार किया' सिनेमा तुफान गाजला होता. आजही टीव्हीवर हा सिनेमा लागला तर अनेकजण तो आवर्जुन पाहतात. सिनेमातील गाणी फार प्रसिद्ध आहेत. यासंबंधितच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक कपल या व्हिडीओत दिल दिवाना या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आपल्या स्वतःच्या अंदाजात त्यांनी डान्स केला. लोकांना त्यांचा हा परफॉर्मन्स फार आवडत आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडननेही या डान्सचं कौतुक केलं आहे.

व्हिडीओत दोघांनी सलमान आणि भाग्यश्रीने सिनेमात जसे कपडे घातले होते तसेच घातले आहेत. दोघांनी शेतात उभं राहून लिप सिंक करत डान्स केला. स्वतः सलमान खान ट्विटरवर फार सक्रिय आहे. त्याने अजूनपर्यंत या व्हिडीओवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी अभिनेत्री रवीना टंडनने या जोडप्याच्या परफॉर्मन्सचं कौतुक केलं.

तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, 'आज मी पाहिलेला हा इंटरनेटवरचा सर्वात क्यूट व्हिडीओ आहे.' विशेष म्हणजे रवीनाशिवाय इतर ट्विटर यूजर्सनेही या व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बापरे! बर्फात गोठलेल्या मांजराला असं मिळालं नवं आयुष्य!

फणस खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत नसतील, एकदा जाणून घ्या!

पार्टनरच्या घोरण्याने तुम्ही त्रस्त आहात.. या घरगुती उपायांनी मिळवा आराम

तुम्ही नाइट शिफ्ट तर करत नाही ना.. कारण हा आजार होण्याची आहे सर्वाधिक शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 08:58 PM IST

ताज्या बातम्या