Home /News /viral /

WOW! या सेल्फी केकला पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, काय आहे नेमका प्रकार पाहा VIDEO

WOW! या सेल्फी केकला पाहून तुम्हालाही बसणार नाही विश्वास, काय आहे नेमका प्रकार पाहा VIDEO

या केक कलाकाराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हे माझे आतापर्यंतचे सर्वात आवडते चित्र आहे आणि माझा चेहरा पूर्णपणे केकने बनवला आहे.

  नवी दिल्ली, 05 डिसेंबर: बर्‍याचदा आपल्यासमोर असे काही फोटो येतात, ज्यामुळे आपलं मेंदू गोंधळात पडतो. काहीवेळा यातिल बहुतांशी चित्रे हाताने किंवा संगणकांच्या मदतीने काढलेली असतात. एखादा कलाकार स्वतःच्या चेहऱ्याचा केक बनवू शकतो यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते शक्य आहे. कारण अगदी स्वतः च्या चेहऱ्याप्रमाणे हुबेहुब दिसणारा केक एका कलाकारने बनवला आहे. ज्यामध्ये किंचितसाही फरक जाणवत नाही. इंस्टाग्रामवर sideserfcakes नावाने लोकप्रिय असलेल्या पेजने हे करुन दाखवलं आहे. चला संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? ते समजून घेऊ. खरंतर, इंस्टाग्रामवर एक पेज आहे, ज्यावर केक्सशी संबंधित विविध प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. केक प्रेमींमध्ये हे पेज बर्‍यापैकी लोकप्रिय आहे. 2 लाखाहून अधिक लोकं या पेजला फॉलो करतात. या पेजबद्दल खास बाब म्हणजे, ते कलाकारांच्या चेहऱ्यांचे चित्र विचित्र केक बनवतात. या केककडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की, हा खराखुरा केक आहे. या व्हिडीओत एका कलाकाराने आपला स्वतःच्या चेहऱ्यासारखाच हुबेहुब केक बनवला आहे. ज्यामध्ये फरक करणे खरंच कठीण आहे.
  हे वाचा-विचित्रच आहे...खरा मालक शोधण्यासाठी म्हशीची झाली DNA टेस्ट! या केक कलाकाराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'हे माझे आतापर्यंतचे सर्वात आवडते चित्र आहे आणि माझा चेहरा पूर्णपणे केकने बनवला आहे.' वास्तविक, हे काम इतक्या बारकाईने केले गेले आहे की, माझा चेहरा आणि केक यातला फरक ओळखणे कठीण आहे. तथापि, या पेजवर आगळ्या वेगळ्या केकची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकवेळा केकचे पुतळेदेखील तयार केले आहेत. केवळ इंस्टाग्रामवरच नाही तर या कलाकाराची लोकप्रियता युट्यूबवरही दिसून येते. येथे त्यांचे 1 लाखाहून अधिक सब्सक्राइबर आहेत. तसेच हा केक बनवण्याच्या प्रक्रियेचा व्हिडिओही त्यांनी यूट्यूबवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 18 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर 82 हजाराहून अधिक लोकांनी त्याला पसंती दिली आहे. या केकला सेल्फी केक असं नाव दिलं आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Viral video.

  पुढील बातम्या