मुंबई 1 डिसेंबर : सोशल मीडियाचं जग हे वेगवेगळ्या व्हिडीओने भरलेलं आहे. हे व्हिडीओ कधी मनोरंजक तर कधी माहिती देणारे असतात, ज्यामुळे ते पाहण्यात आपला वेळ कसा निघून जातो हे आपलंच आपल्याला कळत नाही. पण इथे असे देखील काही व्हिडीओ असतात. जे फारच थरारक असतात. जे पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल.
असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंड होत आहे, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या मुलासोबत एका फ्रिजिंग तलावात, म्हणजेच बर्फाने गोठलेल्या तलावात अडकली आहे. त्या महिलेला तेथून बाहेर येणं देखील शक्य होत नव्हतं, ज्यानंतर अखेर पोलिसांना बोलवून या महिलेला तिच्या मुलासह पाण्याबाहेर काढण्यात आलं.
हे ही पाहा : Video Viral: रस्त्यावर क्रिकेट खेळत होते तरुण, अचानक भरधाव बाईक आली आणि...
आता या महिलेला कसं बाहेर काढलं गेलं? ही महिला इथे अडकलीच कशी किंवा गेली कशी? अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत आणि ते या प्रकरणाबद्दल जाणून घेण्यासाठी इच्छूक आहेत. चला तर मग या प्रकरणाबद्दल सविस्तर जाणू.
खरंतर ही घटना अमेरिकेतील एका शहरातील आहे, या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ खुद्द पोलीस विभागानेच आपल्या अधिकृत हँडलवर शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या ऑरोरा पोलीस विभागाशी संबंधित हे प्रकरण समोर आलं आहे.
एक स्थानिक मुलगा फुटबॉल खेळत असताना त्याचा फुटबॉल या बर्फाळ तलावात गेला तेव्हा तो त्याचा बॉल आणण्यासाठी या तलावात उतरला, तेव्हा ही संपूर्ण घटना घडली.
फुटबॉल त्या बर्फाळ तलावात पडल्यानंतर त्याला काढण्यासाठी हा नऊ वर्षांचा चिमुकलाही गोठलेल्या तलावावर गेला पण तेव्हा बर्फाचा तो भाग विक असल्यामुळे तो तुटला आणि हा चिमुकला त्या तलावात पडला. तेव्हा या मुलाला त्या तलावातून बाहेर पडता येत नव्हतं. अखेर आपल्या मुलाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी त्याची आई आली. पण ती देखील त्यात पडली आणि अडकली.
तलाव गोठलेलं असल्याने त्यांना त्यामधून बाहेर येताच आलं नाही. यानंतर ही महिला मदतीसाठी हाक मारु लागली.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अधिकाऱ्यांनी असे आश्चर्यकारक शौर्य दाखवले जे पाहून सगळेच अवाक झाले.
गोठलेल्या तलावात बुडणारा नऊ वर्षांचा मुलगा आणि त्याला वाचवण्यासाठी उडी मारणाऱ्या महिलेला वाचवण्यात अधिकाऱ्यांना यश आलं. त्यांची कशी सुटका करण्यात आली, हे या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे.
लोक हा व्हिडीओपाहून पोलिसांचे कौतुक करत आहेत, तसेच ते अशा गोष्टींपासून लांब राहाण्यासाठी मुलांची काळजी घ्यावी असं देखील सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking, Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral