WOW VIDEO : निळ्या जेलिफिशने 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष

WOW VIDEO : निळ्या जेलिफिशने 30 सेकंदात साऱ्या जगाचं वेधलंय लक्ष

सध्या हा छोटा जेलिफिश साऱ्या जगात सेन्शेनल गोष्ट झाली आहे. या 30 सेकंदांच्या व्हिडिओने ट्विटरवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्हीही पाहून Share कराल.

  • Share this:

लंडन, 27 सप्टेंबर : निळं आकाश आणि निळा समुद्र सर्वांना भुरळ घालतो. पण सध्या एक निळा जेलिफिश खूप प्रसिद्ध झालाय.  त्या जेलिफिशच्या 30 सेकंदांच्या व्हिडिओने ट्विटरवर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. इंग्लंडमधील मरिन कॉन्झर्वेशन सोसाटीनी 24 सप्टेंबरला हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला आतापर्यत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. साऱ्या जगाचं लक्ष या छोट्याच्या माशाने वेधून घेतलं आहे, असं म्हणता येईल.

मंत्रमुग्ध करणारा हा अविस्मरणीय व्हिडिओ असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. केथ बोरसडन यांनी  शेअर केलेला हा व्हिडिओ  इंग्लंडमधील  गेरलोच हार्बरमध्ये चित्रित करण्यात आला आहे. अनेकांना हा व्हिडिओ अप्रतिम वाटला एकाने केवळ 'Wow' म्हणून प्रतिक्रिया दिली आहे. तर एकाने जेलिफिशने जगाचं आकर्षित केल्याचं म्हटलंय.

गेरलोच जेलफिशसाठी प्रसिद्ध आहे समुद्रात अश्याप्रकारे हा मासा पाहणे एक अद्भुत अनुभव असतो. हा 30  सेकंदांचा व्हिडिओ तोच अनुभव देत असल्याचे अनेकांना वाटते हा विशिष्ट जेलिफिश सायनिया लमारकी म्हणून ओळखला जातो. इंग्लंड आणि आयर्लंड इथे तो सर्वाधिक आढळते कधीकधी अन्नाच्या शोधात किनार्‍यावर येतो. हा मासा आपल्या शरीराचं आकुंचन-प्रसरण करताना  व्हिडिओत दिसत आहे. अशा आकर्षक सुंदर  प्राण्यांकडे थेट जाणं धोकादायक ठरू शकतं. जेलिफिश हा तुम्हाला गंभीर इजा करू शकतो. त्यामुळे त्याच्या अगदी जवळ न जाता दुरूनच बघा, समुद्रातील अनेक जीव आकर्षक वाटतात पण तेवढेच ते धोकादायक असतात. बर्‍याच वेळा अन्नाच्या शोधासाठी ते किनार्‍यावर येतात, त्यामुळे लोकांचं आकर्षण अधिक वाढतं. जेलिफिशच्या या आकर्षक व्हिडिओने मात्र सध्या सर्वांना भुरळ घातली आहे. समुद्रातील असे विशिष्ट जीव नेहमी आकर्षणाचं केंद्र राहिलेले आहेत.

हे वाचा-पाण्यासारखी वाहून गेली 50 हजार लीटर वाइन, VIDEO पाहून वाइन प्रेमींना येईल रडू

त्यातच हा 30 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हा जेलीफिश अत्यंत आकर्षकपणे विहार करताना दिसत आहे. त्याचं ते अनोखे रूप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. समुद्रातील अशा विविध जीवांसंदर्भातील लोकांची उत्सुकता या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत आहे. अनेकांनी उत्सुकतेनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. असा हा व्हिडिओ या जीवांचे दर्शन घडवत आहे. मात्र, माणसांचा समुद्रातील वाढलेला हस्तक्षेपही एक चिंतेचा विषय म्हणून समोर येत आहे. अनेक जीव नष्ट होण्याच्या मार्गावर असल्यानेही एक चिंता यातून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता पर्यावरणप्रेमींकडून या प्राण्यांना मुक्तपणे जगू देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 27, 2020, 7:45 AM IST

ताज्या बातम्या