मराठी बातम्या /बातम्या /Viral /Viral Video: मानवी वस्तीत शिरूनही पिकनिक मूडमधला असा वाघ तुम्ही कधी पाहिला नसेल!

Viral Video: मानवी वस्तीत शिरूनही पिकनिक मूडमधला असा वाघ तुम्ही कधी पाहिला नसेल!

मानवी वस्तीत वाघ शिरल्यानंतर त्यानं केलेल्या हिंसेच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण असा निखळ आनंद घेणाऱ्या वाघाचा VIRAL झालेला VIDEO पाहाच

मानवी वस्तीत वाघ शिरल्यानंतर त्यानं केलेल्या हिंसेच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण असा निखळ आनंद घेणाऱ्या वाघाचा VIRAL झालेला VIDEO पाहाच

मानवी वस्तीत वाघ शिरल्यानंतर त्यानं केलेल्या हिंसेच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण असा निखळ आनंद घेणाऱ्या वाघाचा VIRAL झालेला VIDEO पाहाच

मुंबई, 7 डिसेंबर : मानवी वस्तीत वाघ शिरल्यानंतर त्यानं केलेल्या हिंसेच्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पाहिल्या असतील. मानवी वस्तीत वाघाने पसरवलेली दहशत आणि त्यानं निर्माण केलेला दबदबा मनात धडकी भरवणारा असतो. असे थरारक व्हिडीओही आपण अनेकदा सोशल मीडियावर पाहत असतो. पण मानवी वस्तीजवळ आलेल्या वाघाचा एक भन्नाट VIDEO समोर आला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी वाघाने मानवी वस्तीत शिरून कोणाच्या नरड्याचा घोट घेतला नाही. तर तो काहीसा पिकनिक मूडमध्ये दिसतो आहे.

भारताचे माजी लष्करी अधिकारी कर्नल दिवाकरन पिल्ले यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ 19 हजार नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास 300 जणांनी रिट्वीट केला आहे. हा वाघ कसा पाण्याच्या टाकीजवळ सुरुवातीला घुटमळताना दिसेल. पाणी भरून ठेवलेल्या मोठ्या टाकीचं असं परीक्षण करून झाल्यावर वाघोबा चक्क त्यात उडी मारतात आणि त्यानंतर तर महाशय टब बाथ घेत असल्याच्या थाटात मस्त पहुडतात. पाण्यात पसरून, आयुष्याची मज्जा घेतानाचा हा वाघोबा पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ कुठला आहे आणि कोणी शूट केला? कधी केला? याची माहिती उपलब्ध नाही. पाहा हा वाघाच्या पिकनिकचा व्हिडीओ...

काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत होता. यामध्ये दोन वाघ एकमेकांशी लढाई करत आहेत. सवाई माधोपूरच्या रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात दोन वाघांमधील लढाईचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला होता. या व्हिडीओमध्ये  दोन्ही वाघ खूप आक्रमक झाले आहेत.

एकमेकांच्या तोंडावर पंजे मारून ही लढाई सुरू होते. दोघंही हार मानत नाहीत तर एकमेकांवर तुटून पडतात. 15 सेकंदाच्या लढाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.

First published:

Tags: Tiger, Viral video.