रोम, 08 मार्च : नळ सुरू केला की टाकीतून पाणी येतं. मात्र नळातून चक्क वाइन आल्याचा धक्कादायक प्रकार इटलीतील एका भागात घडला आहे. हा सगळा प्रकार काय आहे हे कुणाल कळलं नाही. मात्र नळातून येणारी ही वाइन कुणी मनसोक्त पित होतं. तर कुणी बाटल्या आणि मिळेल ती भांडी भरून घेऊन जात होतं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान या परिसरात घराजवळच एक वाइनरी घेऊन जाणारी पाईपलाईन आहे. त्यातील बिघाडामुळे हा प्रकार घडला असावा असं सांगितलं जात आहे. त्यामुळे पाण्याचा सप्लाय थांबून वाइन येऊ लागली. लोकांनी ही वाइन टाकून न देता घरातील भांड्यांमध्ये भरून घेतली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Red wine flows from water taps in Italian village after a technical fault at a local winery pic.twitter.com/I6rf2O7DkU
— The Sun (@TheSun) March 6, 2020
सोशल मीडियावर युझर्सनी या व्हिडीओवर तुफान कमेंट्स केल्या आहेत. 102 लोकांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.
मला माहित नाही की हा एखाद्या प्रकारचा प्रसिद्धी स्टंट आहे की तो आपल्याला हसवित आहे किंवा ही एक गंभीर समस्या आहे असं एका युझरनं म्हटलं आहे. तर दुसरा युझर म्हणाला, मला आशा आहे की जे जबाबदार आहेत त्यांच्यावर नक्की कारवाई केली जाईल. घटनेनंतर वाइन तयार करणाऱ्या कारखान्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या फेसबुक पेजवर घडलेल्या प्रसंगाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
हे वाचा-
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.