VIRAL VIDEO: मुसळधार पावसात जेसीबी चालकाने लढवली शक्कल; बाईकस्वाराच्या डोक्यावर धरलं मदतीचं छत्र

व्हिडीओत दिसत आहे की मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे बाइकस्वार रस्त्याच्या कडेला भिजत थांबलाय. पण तो भिजू नये म्हणून कुणी तरी त्याला मदत करतंय.

व्हिडीओत दिसत आहे की मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे बाइकस्वार रस्त्याच्या कडेला भिजत थांबलाय. पण तो भिजू नये म्हणून कुणी तरी त्याला मदत करतंय.

  • Share this:
    नवी दिल्ली, 23 जून: 'प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात जास्त महत्त्वाचा असतो'. हा सुविचार आपण अगदी लहानपणापासून ऐकलेला-वाचलेला असतो. प्रत्यक्षात मात्र सध्याच्या काळात अशा मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांची संख्या खूपच आकसली गेली आहे. तरीही काही मोजके हात कायम मदतीसाठी पुढे येत असतात. परिस्थिती कशीही असली, तरी मदत करायची इच्छा असली, तर ती करणं शक्य होत असतं. अशा मदतीचे काही व्हिडीओ अलीकडे सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या ट्विटरवर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत एक बाइकस्वार (Biker) दिसतोय. बाजूला प्रचंड पाऊस कोसळतोय. त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला भिजत थांबलाय. पण तो भिजू नये म्हणून कुणी तरी त्याला मदत करतंय. व्हिडीओ नीट पाहिल्यावर लक्षात येतं, की एक जेसीबी चालक त्या बाइकस्वाराच्या शेजारी असून, त्याने आपल्या जेसीबीच्या यंत्राचा माती गोळा करण्याचा भाग उलटा करून त्या बाइकस्वाराच्या डोक्यावर धरला आहे. त्यामुळे जोरदार पावसापासून त्याचं संरक्षण होत आहे. पाऊस इतका मुसळधार आहे, की बाइकस्वार भिजणार नाही असं होणारच नाही; पण त्याच्या डोक्यावर छत्र धरल्यामुळे त्याला निदान नीट उभं राहणं तरी शक्य होतंय. 'एनडीटीव्ही'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. एकतर्फी प्रेमाचा कळस! मुंबईच्या डॉननं महिलेच्या पतीला मारण्यासाठी थेट जयपूरला पाठवले शूटर्स; पण... जेसीबीच्या (JCB) केबिनमधल्या काचेवर वायपर फिरत असतानाही व्हिडीओत दिसतंय. म्हणजे जेसीबीचा चालक किंवा त्याच्यासोबत केबिनमध्ये असलेल्या कोणी तरी हा व्हिडीओ शूट केला असावा, असं वाटत आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे आणि तो व्हायरल झाला आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरन (Awanish Sharan) यांनी 23 जून रोजी सकाळी #Wednesdayvibe या हॅशटॅगसह 8.34 वाजता हा अवघ्या आठ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'शक्य असेल तेव्हा नक्की मदत करा आणि ते कायमच शक्य असतं' असं वाक्य शरन यांनी व्हिडीओसोबत लिहिलं आहे. अशा प्रकारचे प्रेरक व्हिडीओ ते नेहमीच शेअर करत असतात. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्या व्हिडीओला 15,200 एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच, 2300 जणांनी हा व्हिडीओ लाइक केला असून, 260 जणांनी तो रिट्विट केला आहे. 23 जणांच्या कमेंट्सही त्यावर आल्या आहेत. जेसीबीचालकाचं हे कृत्य प्रेरणादायी असल्याची भावना या कमेंट्समधून व्यक्त होत असून, सर्वांनीच त्याचं कौतुक केलं आहे.
    First published: