मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रेल्वे फाटक बंद असूनही बाइकवरून क्रॉस करत होता; 38 सेकंदाचा VIDEO अंगावर काटा आणेल

रेल्वे फाटक बंद असूनही बाइकवरून क्रॉस करत होता; 38 सेकंदाचा VIDEO अंगावर काटा आणेल

क्षणाचा हिशोब चुकला तर जीव जाऊ शकतो असे प्रसंग रेल्वे रुळावर अनुभवायला मिळतात. असाच एक थरारक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. अगदी एका सेकंदाचा उशीर झाला असता तर बाइकसारखा तोही....

    मुंबई, 28 जानेवारी : कुठल्या न कुठल्या घाईत अडकून माणूस आपला जीव गमावतो. रेल्वे रुळांवर तर असे अपघात हमखास घडत असतात. यात एका युवकाचा जीव  पद्धतीनं जाता-जाता वाचला आहे. घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (video viral on social media) होतो आहे. भारतीय रेल्वे (Indian railway) वारंवार प्रवासी आणि सामान्य नागरिकांना धोका टाळत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना करत असते. पण सामान्य नागरिक मात्र अनेकदा बेजबाबदारपणे स्वतःचा जीव जणू मुद्दाम धोक्यात घालत असतात. रेल्वे क्रॉसिंगसाठी (railway crossing) गेट बंद असतानाही लोक खाली वाकून रूळ ओलांडतात, सायकल (cycle), बाईकही वाकून घेऊन जातात. यात अनेकदा अनेकांचा जीव गेलेला आहे. तरीही लोकांचे डोळे उघडत नाहीत. असाच एक प्रसंग पुन्हा समोर आला आहे. या प्रसंगाचा व्हीडिओ अंगावर काटा आणतो. त्यातून हासुद्धा संदेश मिळतो, की कुठेही जायला उशीर झाला तरी चालेल, मात्र जीवावर उदार होत अवेळी रेल्वेमार्ग क्रॉस अजिबात करायला नको. @rajtoday  या युजरनं शेअर केलेला हा व्हीडिओ 38 सेकंदांचा आहे. त्याला 30 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि हजारहून जास्त लाइक्स मिळाले आहेत. व्हीडिओमध्ये दिसतं आहे, की रेल्वे क्रॉसिंगचे गेट्स (gates) बंद असतानाही एक युवक (young man) आपल्या गाडीवर बसून लाईन क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो आहे. ट्रेन जवळ आणलेली पाहून तो थांबतो. मात्र तोल गेल्यानं त्याची बाईक (bike) खाली पडते. तो बाईक उचलण्याचा प्रयत्न करत असतानाच वेगवान रेल्वे त्याच्या बाईकला चिरडून निघून जाते. लोकांनी हा व्हीडिओ शेअर करतानाच सुरक्षितता (safety) किती गरजेची आहे याची पुन्हा आठवण करून दिली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Railway accident, Twitter, Viral video.

    पुढील बातम्या