तब्बल 1220 दिवसांनंतर व्हीलचेअरवरून उठली अमेरिकन व्यक्ती, युझर्स म्हणाले 'Real Inspiration'

तब्बल 1220 दिवसांनंतर व्हीलचेअरवरून उठली अमेरिकन व्यक्ती, युझर्स म्हणाले 'Real Inspiration'

रॉबर्टने हा व्हिडीओ टाकल्यानंतर अनेकांनी यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : अनेकदा कोणत्याही आजारातून बाहेर यायला व्यक्तीला मोठा वेळ लागत असतो. मात्र काहीवेळा व्यक्ती त्याच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर या आजारातून लवकर बाहेर पडतो. मात्र अनेकदा आजार किंवा आघात गंभीर असेल तर व्यक्तीला यामधून बाहेर यायला वेळ लागू शकतो. त्याचबरोबर या गंभीर आजारातून बाहेर यायला व्यक्तीकडे केवळ शारीरिक ताकदच नव्हे तर मानसिक रित्या देखील ताकदवान असणे गरजेचे आहे. मात्र काही व्यक्ती मानसिकरीत्या ताकदवान असल्याने कितीही गंभीर आजार असला तरी लवकरच ते यातून बाहेर येतात. सध्या ट्विटरवर देखील अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये तो व्हीलचेअरवरून उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे.

मात्र महत्वाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हा व्यक्ती तब्बल 1,220 दिवसांनी आपल्या व्हीलचेअरवरून उठून उभा राहिला आहे. रॉबर्ट पायलोर नावाच्या या व्यक्तीने आपल्या या आनंदी क्षणांचा व्हिडीओ व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो व्हीलचेअरवरून उठून चालण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे कि, मी आज पहिल्यांदा कुणाच्याही मदतीशिवाय माझ्या व्हीलचेअरवरून उठून चालण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी मला 1220 दिवस लागले. मात्र इतक्या दिवस मी केलेल्या कष्टाचे हे फळ असून कामगार दिन साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगला कोणताही मार्ग नाही. सध्या हा व्हिडीओ ट्विटरवरून मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत असून आतापर्यंत 2.8 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पहिला असून जवळपास 1 लाख 75 हजार लोकांनी लाईक केला आहे. त्याचबरोबर 18 हजार लोकांनी रिट्विट देखील केला आहे.

हे वाचा-लॉकडाऊनमध्ये कबाब खाण्याची आली हुक्की! महिलेला द्यावे लागले सव्वा लाख

रॉबर्टने हा व्हिडीओ टाकल्यानंतर अनेकांनी यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने त्याच्या व्हिडिओवर कमेंट करताना आपला स्वतःचा अनुभव देखील शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले कि,मी देखील या प्रसंगातून गेले आहे. मला या आजारातून बाहेर पाडण्यासाठी 743 दिवस लागले होते. तू प्रयत्न करत राहा. तुला यश नक्कीच मिळेल. तर एकाने त्याची प्रशंसा करताना त्याला प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला तर एकाने म्हटले कि, त्याच्या या कृत्यामुळे तिला यामधून प्रेरणा मिळाली आहे. तर एकाने त्याला रिअल फायटर म्हटले आहे. एका युजरने आपला अनुभव शेअर करताना लिहिले कि, तो देखील अशाच कठीण काळातून गेला आहे. 12 वर्षांचा असताना त्याच्या मणक्याची काही हाडे मोडली होती. डॉक्टरांनी त्याला तो कधीही चालू शकणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने या संकटातून बाहेर पाडण्यात यश मिळवले.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 10, 2020, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading