वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

व्हिडीओत स्पष्ट दिसतं की दोन्ही वाघ प्रचंड रागात असून एकमेकांसोबत सर्व शक्ती पणाला लावून लढत आहेत. भांडण वाढल्यानंतर वाघिण तिथून पळ काढते.

News18 Lokmat | Updated On: Nov 3, 2019 01:05 PM IST

वाघिणीसाठी दोन सख्खे भाऊ भिडले, जंगलातील थरारक घटनेचा Viral Video

राजस्थानमधील रणथंभोर नॅशनल पार्कमध्ये दोन वाघांच्या भांडणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. आयएफएस अधिकारी प्रविण कासवान यांच्यामते, ते दोन वाघ अनुक्रमे टी57 आणि टी58 आहेत. कासवान यांनी ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला यात वाघिणीसाठी दोन भावांमधील हिंसक भांडण स्पष्ट दिसत आहे. रणथंभोर येथील गाइडच्या मते, टी57 वाघाचं नाव सिंगस्थ आहे तर टी58 वाघाचं नाव रॉकी आहे. हे दोघंही सख्खे भाऊ असून जयसिंघपुरा क्षेत्रातील शर्मिली वाघिणीची मुलं आहेत.

व्हिडीओ शेअर करताना कासवान यांनी वाघिणीचीही माहिती दिली. हे दोन्ही वाघ टी39 नंबरची वाघीण नूरसाठी भांडत होते. व्हिडीओत स्पष्ट दिसतं की दोन्ही वाघ प्रचंड रागात असून एकमेकांसोबत सर्व शक्ती पणाला लावून लढत आहेत. भांडण वाढल्यानंतर वाघिण तिथून पळ काढते. इथे पाहा व्हिडीओ-

Loading...

आतापर्यंत 25 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून यावर अनेक कमेन्टही आल्या आहेत. कासवान यांनी हेही सांगितलं की, या भांडणात टी57 वाघ सिंगस्थ जिंकला आणि यात दोन्ही वाघ सुखरूप असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

आता ब्रेकअप झाल्यावरही व्हा खूश, कारण त्याचेही आहेत अनोखे फायदे!

Haunted Places- देशातील या ठिकाणी जायला आजही घाबरतात लोक, तुम्ही जाऊ शकाल का?

लसणाचे शरीरासाठी आवश्यक असलेले हे गुणधर्म तुम्हाला माहीत आहेत का?

आयुष्यात एकदा तरी या शहरांना भेट द्या आणि आपली Bucket List पूर्ण करा

...म्हणून आजही पुरुषांना वयाने मोठ्या मुली आवडतात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2019 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...