Home /News /viral /

Viral Video : गर्लफ्रेंडला डोंगरावरुन ढकललं, उंचावरुन पडतानाही प्रियकराला ओरडून म्हणाली...

Viral Video : गर्लफ्रेंडला डोंगरावरुन ढकललं, उंचावरुन पडतानाही प्रियकराला ओरडून म्हणाली...

या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    नवी दिल्ली, 26 जून : बन्जी जम्पिंगसाठी गेलेल्या एका दाम्पत्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, बन्जी जम्पिंगदरम्यान एक व्यक्ती आपल्या प्रेयसीला डोंगरावरुन धक्का देतो. मात्र डोंगरावरुन पडल्यानंतर हवेत असताना तरुणी असं काही म्हणते, ज्यामुळे प्रियकरालाही धक्काच बसतो. शेकडो फूट उंचावरुन उडी मारल्यानंतर जेव्हा तरुणी हवेत असते, तेव्हा ती प्रियकरासोबत ब्रेकअप केल्याचं ओरडून सांगते. बन्जी जम्पिंगच्या एडव्हेंचरच्या नादात दाम्पत्याचं ब्रेकअप झाला. जेव्हा डोंगरावरुन तरुणीला दिला धक्का... हा व्हिडीओ ट्विटरवरुन शेअर करण्यात आला आहे. येथे व्हिडीओला 60 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशाप्रकारे बन्जी जम्पिंगसाठी प्रियकराने आपल्या प्रेयसीला उंच डोंगरावरुन धक्का दिला. जमिनीवर येण्यापूर्वीच प्रेयसी ओरडून प्रियकराला म्हणाली की, मी तुझ्याशी ब्रेकअप करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Boyfriend, Viral video on social media

    पुढील बातम्या