याला म्हणतात माणूसकी! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्याने वाचवलं कुत्र्याला, पाहा Viral Video

याला म्हणतात माणूसकी! स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता त्याने वाचवलं कुत्र्याला, पाहा Viral Video

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की एक कुत्रा पाण्यात बुडत आहे तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो पण भिंत उंच असल्यामुळे त्याला बाहेर येता येत नाही.

  • Share this:

सध्या सोशल मीडियावर चीनमधील एक फोटो व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून जगात अजून माणूसकी शिल्लक आहे असं तुम्ही नक्की म्हणाल. एका व्यक्तीने आपल्या जीवाची पर्वा न करता बुडत्या कुत्र्याचे प्राण वाचवले. ट्विटरवर 'पीपल्स डेली चायना'ने हा व्हिडीओ शेअर केला असून, सर्व स्थरांवरून त्या व्यक्तीचं कौतुक केलं जात आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की एक कुत्रा पाण्यात बुडत आहे तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतो पण भिंत उंच असल्यामुळे त्याला बाहेर येता येत नाही. एवढ्यात तिथे एक व्यक्ती येतो आणि कसलीही पर्वा न करता तो कुत्र्याला वाचवण्यासाठी पुढे सरसावतो.

हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर आतापर्यंत 31 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. अनेकांनी त्या व्यक्तीच्या कृतीचं कौतुक करत म्हटलं की, 'एक चांगली व्यक्ती होण्यासाठी काही सेकंदच लागतात. त्याने उल्लेखनिय काम केलं.' तर दुसऱ्या एका व्यक्तिने लिहिले की, 'मुक प्राण्यांसाठी अशी मानवता असणं गरजेची आहे.'

वेळीच जाणून घ्या, रोज सकाळी लिंबू पाणी पिण्याचे हे अनोखे फायदे!

कर्करोगाच्या या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर...

आयुष्यात एकदा तरी या शहरांना भेट द्या आणि आपली Bucket List पूर्ण करा

...म्हणून आजही पुरुषांना वयाने मोठ्या मुली आवडतात

First published: November 3, 2019, 11:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading