Home /News /viral /

अरे देवा! कोरोनाच्या भीतीनं पोलिसांनी दांडुके केले सॅनिटाइज, VIDEO VIRAL

अरे देवा! कोरोनाच्या भीतीनं पोलिसांनी दांडुके केले सॅनिटाइज, VIDEO VIRAL

कोरोना व्हायरस होऊ नये म्हणून चक्क पोलीसच आपल्या दांडक्याला सॅनिटाइज करताना दिसत आहेत.

    मुंबई, 28 मार्च : देशभरात कोरोनाचा कहर वाढत आहे आणि व्हायरल व्हिडीओचाही. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 800 हून अधिक गेली असून महाराष्ट्रातही 135 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. इतकच नाही पंजाब, महाराष्ट्रात तर कर्फ्यूही लावण्यात आला आहे. लॉकडाऊनदरम्यान विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. काही ठिकाणी तर पोलिसांनी दांडक्यानं तरुणांना फटकवलंही आहे. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता आणखी एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो म्हणजे ज्या दांडक्यानं पोलिसांनी कर्फ्यू दरम्यान बाहेर फिरणाऱ्या तरुणांना फटके दिले आहेत आणि हवेतील विषाणू आपल्या दांडक्याला लागून कोरोना व्हायरस होऊ नये म्हणून चक्क पोलीसच आपल्या दांडक्याला सॅनिटाइज करताना दिसत आहेत. पोलिसांच्या या व्हायरल व्हिडीओने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. युझर्सनी या व्हिडीओला तुफान लाईक्स आणि कमेट्स केल्या आहेत. एका युझरने म्हटलं आहे याला म्हणतात गंभीरता, तर दुसरा युझर म्हणतो की पोलिसांची लाठीशिवाय लोक ऐकणार नाहीत. तर तिसरा युझर म्हणाला पोलिसांचा सॅनिटाइज केलेली लाठी पाठीवर पडली की सगळे विषाणू पळून जातील. एक युझर म्हणाला आहे हरियाणा पोलिसांच्या या दांडक्यापेक्षा घरी बसा ते केव्हाही चांगलं. हे वाचा-VIDEO : मास्क न लावता घराबाहेर पडले, पोलिसांनी टी-शर्ट तोंडाला बांधायला लावला कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रशासनानं काही नियम सांगितले आहेत त्याचं पालन करणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हिताचं आहे. पोलिसांनी ते गंभीरतेनं घेतलं आहे. त्यामुळे ह्या व्हिडीओला जरी युझर्सनी हलक्या फुलक्या स्वरुपात घेतलं असलं तरी कोरोनाचा वाढता संसर्ग भीती निर्माण करणार आहे. अनेकांनी याचा धस्का घेतला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ झाली आहे. तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान विनाकारण बाहेर पडणं टाळा असं आवाहन पोलिसांकडूनही केलं जात आहे. हे वाचा-कुणासाठी करतोय..,म्हणत 'लेडी सिंघम'ने संचारबंदी तोडणाऱ्यांना चोपले, पाहा हा VIDEO
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Corona virus in india, Symptoms of coronavirus, Viral video.

    पुढील बातम्या