Bikiniमध्ये फिरणाऱ्या महिलेसोबत पोलिसांचं गैरवर्तन, VIDEO VIRAL

Bikiniमध्ये फिरणाऱ्या महिलेसोबत पोलिसांचं गैरवर्तन, VIDEO VIRAL

बीचवर बिकनिमध्ये फिरणं ही फार कॉमन गोष्ट असतानाही चक्क फॉरेनर असणाऱ्या महिलेला बिकनी घातल्यामुळे गैरवर्तनाला सामोरं जावं लागल्याचा प्रकार घडला आहे.

  • Share this:

मालदीव, 08 फेब्रुवारी: बीचवर बिकनिमध्ये फिरणं ही फार कॉमन गोष्ट असतानाही चक्क फॉरेनर असणाऱ्या महिलेला बिकनी घातल्यामुळे गैरवर्तनाला सामोरं जावं लागल्याचा प्रकार घडला आहे. बीचवर बिकनी घालून आल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक पोलिसांनी महिलेच्या अंगावर जबरदस्ती कपडे चढवल्याचा प्रकार घडल्या. संशयित आरोपी पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सुरुवातीला महिलेला बिकनी घालण्यास मनाई असल्याचं सांगितलं होतं. मात्र महिला ऐकण्यास तयार नव्हती. तिथे बाचाबाची झाली आणि उपस्थित असलेल्या पुरुष पोलिसांनी महिलेला पकडून तिच्या अंगावर कपडे चढवले. दरम्यान हा सगळा प्रकार तिथे असलेल्या तरुणाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ मालदीव इथल्या समुद्रकिनाऱ्यावरचा असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर तिथल्या पोलीस आयुक्तांनी या घटनेप्रकरणी महिलेची माफी मागितली आहे. पोलिसांनी अशा पद्धतीनं समजवणं आणि त्यांनी महिलेसोबत केलेलं वर्तन गैर असल्याचं म्हटलं आहे. मालदीव हे टुरिझमसाठी अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे आणि तिथे अशापद्धतीनं एखादा प्रकार घडणं शरमेची बाब असल्याचंही पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे.

हेही वाचा-

ही महिला नशेत होती आणि ती बिकनी घालून आली असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं होतं मात्र नंतर सोडून देण्यात आलं. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हॉलिडे रिसॉर्ट इथे येणारे टुरिस्ट बिकनी घालू शकतात मात्र माफुशी आइलंड इथे बिकनी घालण्यास परवानगी नसल्यानं महिलेला अडवण्यात आलं होतं. याआधी फिलीपीन्स इथे अशा पद्धतीची घटना समोर आली होती. बिकनी घालून येणाऱ्या महिलेला 3400 रुपयांचा दंड आकारण्यात आला होता.

हेही वाचा-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2020 01:40 PM IST

ताज्या बातम्या