रॅम्प वॉक करताना पाकिस्तानी मॉडेल अडखळली आणि...; पाहा हा Viral Video

फॅशन पाकिस्तान वीकच्या तिसऱ्या दिवशी केशा सिद्दिकी रॅम्पवर चालत होती. तेव्हा तिचे हिल्स तुटले. तिच्या मागे मॉडेल सुभान अवान चालत होता.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 03:18 PM IST

रॅम्प वॉक करताना पाकिस्तानी मॉडेल अडखळली आणि...; पाहा हा Viral Video

सोशल मीडियावर सध्या एका पाकिस्तानी मॉडेलचं भरभरून कौतुक केलं जात आहे. या मॉडेलने त्याच्या महिला साथीदाराला रॅम्पवर पडताना वाचवल्यामुळेच सध्या त्याचं कौतुक केलं जात आहे. त्याचं झालं असं की, रॅम्पवर चालत असताना अचानक महिला मॉडेलने घातलेली हिल्स तुटली. यामुळे ती अडखळून पडणार इतक्याने पुरुष मॉडेलने तिला सावरलं. एवढंच नाही तर तिच्या चपला काढायला मदत केली आणि नंतर त्या चपला स्वतःच्या हातात घेऊन दोघांनी रॅम्प वॉक पूर्ण केला.

Loading...

फॅशन पाकिस्तान वीकच्या तिसऱ्या दिवशी केशा सिद्दिकी रॅम्पवर चालत होती. तेव्हा तिचे हिल्स तुटले. तिच्या मागे मॉडेल सुभान अवान चालत होता. त्याने केशाला फक्त सांभाळलंच नाही तर तिचे हिल्स उचलले आणि तिच्यासोबत रॅम्प वॉक पूर्ण केला.

व्हिडीओत स्पष्ट दिसतं की, सुभान अवान रॅम्पवर खाली बसला आणि त्याने केशाच्या पायातील हिल्स काढले. सुभानच्या या कृतीमुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडात करत त्याचं कौतुक केलं. सुभानने दोन्ही हिल्स काढल्यानंतर केशाने अनवाणी रॅम्प वॉक केला. लोकांनी दोन्ही मॉडेलसाठी टाळ्या वाजवल्या. सुभान अवानला सोशल मीडियावर 'ट्रू जेन्टलमन' असं म्हणत आहेत.

जगातील सर्वात जास्त प्रदूषण पसरवणाऱ्या टॉप 5 कंपन्या, भारतातील या कंपनीचंही नाव

जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही; 'या' उपायांनी दूर होईल घशातील खवखव

गिनीज बुकमध्ये तिरंग्याचा दबदबा; 80हून अधिक भन्नाट रिकॉर्ड भारतीयांच्या नावावर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 03:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...