...आणि शहामृगाने सायकलस्वारांना हरवलं, रेसिंगचा थरारक VIDEO व्हायरल

...आणि शहामृगाने सायकलस्वारांना हरवलं, रेसिंगचा थरारक VIDEO व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सायकल रेसिंगमध्ये भाग घेतलेल्या एका शहामृगाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

  • Share this:

दक्षिण आफ्रिका, 08 ऑक्टोबर : सोशल मीडियावर अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल (Viral Video on Social Media) होत असतात. यामध्ये विविध जंगली प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होतात तर कधी पाळीव प्राण्यांचे. सध्या अशाच प्रकारचा एका शहामृगाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये शहामृग सायकल रेसिंग करणाऱ्या माणसांबरोबर धावताना दिसत आहे. जणू काही त्याने देखील या लोकांबरोबर स्पर्धा लावली आहे. सायकल रेसिंगच्या ट्रॅकवर या व्यक्ती सायकलिंग करत असताना हा शहामृग मध्येच येऊन त्यांच्याबरोबर धावतो आहे, असा मजेदीर व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) हा व्हिडीओ असून यामध्ये हा शहामृग सायकलस्वारांशी  त्यांच्याबरोबर रेस लावताना दिसतोय. डॅनिअल रेस नावाच्या सायकलस्वाराने आपल्या कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडीओ शूट केला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हा शहामृग केवळ या सायकल रेसरच्या बरोबरीने धावत नाही तर त्यांना मागे सोडत ही रेस जिंकतो. सुरुवातीला डाव्या बाजुने धावणारा शहामृग एकदम उजव्या बाजुला येवून धावू लागल्याने एका क्षणासाठी काळजाचा ठोका चुकतो.

(हे वाचा-पाकिस्तानमधील तो व्हायरल चहावाला आठतोय का? आता आहे स्वत:चा कॅफे; पाहा VIDEO)

या व्हिडीओविषयी त्याने असे म्हटले आहे की, डोंगराच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरु असताना अचानक त्यांच्यामध्ये हे शहामृग आलं. त्यांच्या सायकल बरोबर शहामृग देखील धावू लागलं. त्यामुळे सुरुवातीला त्यांना याची भीती वाटली. हे शहामृग त्यांच्यावर हल्ला करेल की काय अशी भीती त्यांना होती. पण त्यानंतर हे शहामृग त्यांच्या सायकलबरोबर धावू लागलं.

दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहामृग हा जगभरातील सर्वांत मोठा पक्षी आहे. हा पक्षी उडू शकत नाही, पण सर्वांत वेगाने धावू शकतो. 43 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगाने शहामृग धावू शकतो. त्याचबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी या दोन्ही गटात हा पक्षी मोडतो. विविध प्रकारच्या छोट्या किड्यांबरोबरच पाल देखील याचं खाद्य आहे. त्याचबरोबर छोटी कंदमुळं आणि बियादेखील या पक्षाचं खाद्य आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 8, 2020, 11:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या