Home /News /viral /

'ए भाई जरा देख के चलो'... रस्त्यावरच्या हत्तीच्या VIRAL VIDEO बरोबर IAS प्रियांका शुक्ला यांची कमेंटही झाली व्हायरल

'ए भाई जरा देख के चलो'... रस्त्यावरच्या हत्तीच्या VIRAL VIDEO बरोबर IAS प्रियांका शुक्ला यांची कमेंटही झाली व्हायरल

एका अभयअरण्यामधून जाणाऱ्या रस्त्यावर एक अजस्त्र हत्ती शांतपणे उभा आहे.

एका अभयअरण्यामधून जाणाऱ्या रस्त्यावर एक अजस्त्र हत्ती शांतपणे उभा आहे.

हत्तीचा हा व्हीडिओ ट्वीटरवर (Twitter) पोस्ट करण्यात आला आहे. बंगलोरचे फॉरेस्ट ऑफिसर प्रविण कासवान यांनी आपल्या ट्वीटरवर अकाऊंटवरुन (Twitter Account) हा व्हडिओ शेअर केलेला आहे.

    बंगलोर 17 मे : कधीकधी माणूस आपल्याच भितीमध्ये इतका गुरफटतो की, न करणारी गोष्टही करुन बसतो. माणसाच्या मनातीन भिती त्याला एखाद्या मोठ्या संकटातही टाकू शकते. हेच दाखवणारा एक व्हीडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर व्हायर (Viral) झाला आहे. हा व्हीडिओ ट्वीटरवर (Twitter) पोस्ट करण्यात आला आहे. बंगलोरचे फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कासवान यांनी आपल्या ट्वीटरवर अकाऊंटवरुन (Twitter Account) हा व्हडिओ शेअर केलेला आहे. हा हत्ती यावेळी नेमका काय विचार करत असेल? असं कॅप्शन (Capuchin) त्यांनी या व्हीडिओला दिलं आहे. (‘मॅडम कुठपर्यंत कात्री मारलीये’; विचित्र फॅशनमुळे अनेकदा ट्रोल झालीये नुशरत) एका अभयअरण्यामधून जाणाऱ्या रस्त्यावर एक अजस्त्र हत्ती (Elephant) शांतपणे उभा आहे. कदाचित त्यालाही रस्ता ओलांडून पुढे जायचे आहे. पण, काही न सुचल्याने तो रस्त्यामध्येच उभा आहे. मात्र, त्याच वेळी एक माणूस त्या रस्त्याने स्कुटीवर येतो. धुकं पसरलं असल्याने त्या माणसाला हा हत्ती लांबून दिसला नसेल पण, जवळ आल्यावर त्याची पाचावर धारणा बसली. लटपटत्या हाताने तो गाडी चालवत राहतो. पण, भीतीमुळे त्याचा तोल जातो आणि स्कुटीवरुन पडतो. पडल्यानंतर तर, तो अजून घाबरतो. गाडी उचलावी की, पळून जावं या विचीरात असताना. धीर करुन गाडी उचलतो. गाडीवरुन पडल्याने त्याला थोडं लागलेलं आहे. पण, हत्तीच्या भितीने मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नाही. (ही तरुणी ठरली Miss Universe; पाहा जगातील सर्वात सुंदर महिलेचे Photos) हे सगळं घडत असताना हत्ती मात्र, आपल्याचं जागेवर उभा राहुन नेमकं काय घडतंय? हे पाहत राहतो. एका कार मध्ये बसलेल्या लोकांनी हा व्हीडिओ शुट (Video Shoot) केला आहे. या व्हीडिओवर प्रचंड कमेंट येत आहेत. छत्तीसगडच्या आएएस ऑफिसर प्रियांका शुक्ला यांनी ‘ए भाई जरा देख के चलो…’ असं हा हत्ती म्हणत असेल असं कमेटं केलं आहे. तर, काहींनी तुझा पाय तुटला का? असं हत्ती  विचारत असेल असं म्हटलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Twitter, Viral video.

    पुढील बातम्या