क्षणार्धात जमीनदोस्त झाला भलामोठा टॉवर; घटनेचा VIDEO आला समोर

क्षणार्धात जमीनदोस्त झाला भलामोठा टॉवर; घटनेचा VIDEO आला समोर

या व्हिडिओमध्ये डाल्टन डीब्लासोद्वारा काढण्यात आलेल्या फुटेजमध्ये टॉवर काहीच सेकंदात जमीनदोस्त (Tower Comes Crumbling Down) झाल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 25 जून : एखादा भलामोठा टॉवर अचानक जमिनदोस्त होणं ही मोठी गोष्ट आहे. अनेकदा सोशल मीडियावर टॉवर अचानक कोसळल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. हे व्हिडिओ पाहून अनेकांनी भीती वाटते. सध्या सोशल मीडियावर असाच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल (Viral Video) होत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये डाल्टन डीब्लासोद्वारा काढण्यात आलेल्या फुटेजमध्ये टॉवर काहीच सेकंदात जमिनदोस्त (Tower Comes Crumbling Down) झाल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया येथील फोंबेलमधील शेतात बांधण्यात आलेला हा टॉवर खराब स्थितीत आढळून आल्यानंतर तो पाडण्यात आला. खरं तर सायलोच्या मालकांना वाटले, की त्यांनी काही केलं नाही तरीही जीर्ण अवस्थेमुळे हा मनोरा स्वतःच कोसळेल. डाल्टन डीब्लासो म्हणाले, “शेतातील सायलो खराब स्थितीत होता आणि तो कोसळणार होता. म्हणून आम्ही तो स्वतःच कोसळण्यापूर्वी पाडण्याचा निर्णय घेतला. "

6 वर्षीय चिमुकलीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; नटखट अभिनयाचे इंटरनेटवर लाखो चाहते

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतं की सुरुवातीला याला काही धडकल्यासारखा आवाज होतो. सायलो जमिनीवर कोसळू लागतो आणि यातून धुराचा लोट आल्याप्रमाणं दिसतं. एरिन नावाच्या दर्शकाने लिहिले, की सायलो अशा प्रकारे कोसळेल अशी अपेक्षा नव्हती. त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने असे लिहिले, हे दृश्य खरोखर भितीदायक आहे.

बापरे! अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि..; VIDEO पाहून व्हाल हैराण

हा व्हिडिओ दोन दिवस आधीच हॉगनं यूट्यूबवर व्हायरल केला होता. आतापर्यंत अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. यासोबतच अनेकांनी व्हिडिओ लाईकही केला आहे. असे व्हिडिओ अनेकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. ही दृश्य लोकांना अतिशय भयंकर वाटतात, याच कारणामुळे असे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

Published by: Kiran Pharate
First published: June 25, 2021, 11:04 AM IST

ताज्या बातम्या