गोरखपूर 6 सप्टेंबर : तुम्ही तुमच्या आजूबाजूला चोरीच्या घटना घडल्याचं ऐकलं असेल. काहींनी ते पाहिलं देखील असेल. हे चोर फोन, पैस, दागिने किंवा खाण्याची वस्तू घेऊन पळतात आणि ते पैसे मिळवण्याच्या उद्देशानेच चोरी करतात. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील आपण पाहिले असेल. परंतू सध्या सोशल मीडियावर एका चोरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण या व्हिडीओमध्ये चोरी जी वस्तु चोरतो ते पाहून तुम्हाला मोठा प्रश्नच पडेल.
बऱ्याचदा चोर आपला जीव धोक्यात टाकून चोरी करतात. परंतू या चोराने तर महिलांचे अंडरगारमेंट चोरण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकला आहे. हो, तुम्हाला आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे. या घटनेचा एक सीसीटीव्ही फुटेज देखील व्हायरल झाला आहे. जो पाहून तुम्हाला विश्वास बसेल की, हा चोर फक्त महिलांचे वापरलेले अंडरगार्मेंट चोरण्यासाठी घरात घुसला.
ही घटना मध्यप्रदेशमधील ग्वालियरमधील आहे. जेथे सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोर घरात घुसून अंडरगार्मेंट चोरी करताना दिसला. खरंतर या भागात मागील काही दिवसांत अनेक महिलांचे अंडरगार्मेंट चोरीला गेले होते. परंतू लाजेमुळे याबाबत कोणी पोलिसात तक्रार केली नव्हती.
हे वाचा : सुंदर दिसण्यासाठी ती पार्लरमध्ये गेली, पण जेव्हा घरी परतली तेव्हा मात्र... नक्की काय घडलं?
अखेर एका व्यक्तीने जेव्हा याबाबत पोलिसात तक्रार केली तेव्हा तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले गेले. तेव्हा पोलिसांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य़ वाटले.
#MadhyaPradesh #Gwalior's "Serial Bikini Chor"! In the last few days, a thief allegedly stole women's undergarments from 6 houses in No. 2 street of Gospura area of the city. Captured on #CCTV stealing underwear from businessman Bhagat Singh's house last night.++ pic.twitter.com/FaKXgX2iRx
— Siraj Noorani (@sirajnoorani) September 5, 2022
या सीसीटीव्हीमध्ये त्यांनी पाहिलं की एक तरुण एका घरात घुसला आणि काही मिनिटांनी बाहेर आला आणि त्याच्या हातात महिलांचे अंडरगार्मेंड होते. पोलिसांनी या चोराची ओळख पटवली आहे आणि ते या चोराला पकडण्यासाठी सापळा रचत आहेत. लवकरच या चोराला पकडलं जाईल.
हे वाचा : तो प्लॅटफॉर्मवरुन खाली पडला आणि समोरुन भरधाव वेगानं ट्रेन आली, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
परंतू हा चोर महिलांचे वापरलेले अंडरगार्मेंट का चोरत आहे? यामागचं कारण पोलिसांना कळलेलं नाही. आता हा चोरच त्याचा यामागचा हेतू सांगू शकतो आणि आपल्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking news, Theft, Top trending, Video viral