• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: भूगोलच नाही तर गणितातही कच्चे आहेत इम्रान खान; भारताची लोकसंख्या सांगितली 1 अब्ज 300 कोटी

VIDEO: भूगोलच नाही तर गणितातही कच्चे आहेत इम्रान खान; भारताची लोकसंख्या सांगितली 1 अब्ज 300 कोटी

या व्हिडिओमध्ये क्रिकेटबद्दल बोलताना इम्रान खान म्हणतात, की 40 ते 50 लाख लोकसंख्येनं हिंदुस्तान ज्याची लोकसंख्या 1 अब्ज 300 कोटी आहे त्याला टेस्ट क्रिकेटच्या चॅम्पियनशिपमध्ये हरवलं.

 • Share this:
  नवी दिल्ली 02 ऑगस्ट : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांनी यावेळी हे सिद्ध केलं आहे, की त्यांचं केवळ भूगोलच नाही तर गणितही कच्चं आहे. जपान आणि जर्मनी शेजारी देश असल्याचं सांगणाऱ्या इम्रान यांनी आता भारताची लोकसंख्या 1 अब्ज 300 कोटी असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर इम्रान खान यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video of Imran Khan) होत आहे. यात ते भारताची लोकसंख्या (India’s Population) 1 अब्ज 300 कोटी असल्याचं म्हणत आहेत. या व्हिडिओमध्ये क्रिकेटबद्दल बोलताना इम्रान खान म्हणतात, की क्रिकेटमध्ये दोन वर्ल्ड कप आहेत. एक वनडे क्रिकेटचा आणि दुसरा टेस्ट क्रिकेटचा. 40 ते 50 लाख लोकसंख्या असलेल्या देशानं, हिंदुस्तान ज्याची लोकसंख्या 1 अब्ज 300 कोटी आहे त्याला टेस्ट क्रिकेटच्या चॅम्पियनशिपमध्ये हरवलं. इम्रान खानचं सामान्य ज्ञान अशाप्रकारे समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट! 18 सेकंदात फस्त केला तब्बल 2 लीटर सोडा; पाहा VIDEO याआधी 2019 मध्ये इराण दौऱ्यावेळी मीडियासोबत बोलताना इम्रान यांनी जपान आणि जर्मनी आपले शेजारी असल्याचं म्हटलं होतं. पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले होते, की जर्मनी आणि जपानमधील हजारो लोकांनी दुसऱ्या महायुद्धानंतर आपले प्राण गमावले होते, परंतु काही वर्षांनी दोन्ही देशांनी सीमेवर संयुक्त व्यापार करण्याचा निर्णय घेतला. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्र यांनी इम्रान खान यांचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. शेतकऱ्याला उधाणलेल्या नदीने घेतलं सामावून; गावकऱ्यांची मदतही अपुरी, भयावह VIDEO वास्तविक पाहता जपान आशियात येतं, तर जर्मनी युरोपियन देशात आणि दोन देशांमधील अंतर हजारो किमी आहे. आपल्या या अज्ञानामुळे इम्रान खानला पाकिस्तानातही टीकेला सामोरे जावे लागले. माजी परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खान यांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हटलं की, खान यांनी पाकिस्तानला हास्यास पात्र बनवलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: