मराठी बातम्या /बातम्या /Viral /एअरपोर्टवर पोहोचताच आईकडून चपलांचा प्रसाद, अनोखं प्रेम पाहून प्रवाशांना आलं हसू; पाहा VIDEO

एअरपोर्टवर पोहोचताच आईकडून चपलांचा प्रसाद, अनोखं प्रेम पाहून प्रवाशांना आलं हसू; पाहा VIDEO

आईनं मुलाला भेटल्यानंतर थेट पायातील चप्पल काढत त्याचा धोपटून (Viral video of mother beating son by shoe) काढल्याचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आईनं मुलाला भेटल्यानंतर थेट पायातील चप्पल काढत त्याचा धोपटून (Viral video of mother beating son by shoe) काढल्याचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आईनं मुलाला भेटल्यानंतर थेट पायातील चप्पल काढत त्याचा धोपटून (Viral video of mother beating son by shoe) काढल्याचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली, 2 डिसेंबर: आईनं मुलाला भेटल्यानंतर थेट पायातील चप्पल काढत त्याचा धोपटून (Viral video of mother beating son by shoe) काढल्याचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आई आणि मुलगा यांच्यातील नात्यांचे (Relation between son and mother) बंध हे अनोखे असतात. प्रत्येक आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं, मात्र ते व्यक्त करण्याची प्रत्येक आईची पद्धत मात्र वेगवेगळी असते. काहीवेळा आई गोंजारून, माया करून आपलं प्रेम व्यक्त करते, तर काही वेळा धपाटे घालून आणि ओरडून प्रेम बाहेर पडतं. अशाच प्रकारे मुलाला पाहताच आपल्या पायातील चप्पल काढून त्याने मुलाची पूजा करणाऱ्या आईचा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Anwar Jibawi (@anwar)

विमानतळावर केलं स्वागत

विमानतळावर आईचं स्वागत करायला आलेला तरुण या व्हिडिओत दिसतो. त्यानं आईच्या स्वागतासाठी फुलांचा गुच्छ घेतला आहे. दुसऱ्या हातात WE MISS YOU असं लिहिलेला एक बोर्डदेखील ठेवला आहे. अनेक दिवसांनी या तरुणाला त्याची आई भेटत असावी, असं हा व्हिडिओ पाहून वाटतं.

मुलाला पाहताच उचलते चप्पल

विमानतळातून बाहेर पडणारी आई आणि तिला नेण्यासाठी आलेला तिचा मुलगा आपल्याला व्हिडिओत दिसतात. मुलाला पाहिल्या पाहिल्या आई आपल्या पायातून चप्पल बाहेर काढते आणि ते हातात उचलून मुलाला बदडून काढायला सुरुवात करते. आईची ही प्रतिक्रिया जणू अपेक्षितच असल्यामुळे मुलगा थोडीफार नाटकं करत हसत हसत तिचा मार सहन करतो. विमानतळावर आजूबाजूनं जाणारे लोक हे दृश्य पाहून हसतात आणि या प्रसंगाची मजा लुटत असल्याचं दिसतं.

हे वाचा-  फक्त ख्रिसमसच्या रात्री ‘संस्कारी प्रेमिका’ देते धोका, मग वर्षभर राहते एकनिष्ठ

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

आईचं प्रेम व्यक्त करण्याची हीच खरी भारतीय पद्धत असल्याची प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे. आईचं मुलावर खोटं खोटं रागावणं हेदेखील प्रेमच असतं. या व्हिडिओतून तेच प्रेम पाहायला मिळत असल्याच्या प्रतिक्रिया युजर्सनी दिल्या आहेत.

First published:

Tags: Delhi, Mother, Son, Viral video.