राणू मंडल नंतर व्हायरल होतंय या गायकाचा VIDEO, गायलं बाहुबलीतील सर्वात कठीण गाणं

राणू मंडल नंतर व्हायरल होतंय या गायकाचा VIDEO, गायलं बाहुबलीतील सर्वात कठीण गाणं

सोशल मीडियावर तुमचे आवडते कलाकार तर प्रसिद्ध होतातच पण त्याचबरोबर काही सामान्य नागरिक देखील सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होत आहेत. सध्या बाहुबलीतील गाणं गाणाऱ्या एका तरूणाचा व्हिडीओ प्रसिद्धी मिळवत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 मे : सध्या सोशल मीडियावर (Social Media) कुणी, कसं आणि केव्हा प्रसिद्धी मिळवेल हे काही सांगू शकत नाहीत. प्रसिद्ध कलाकार देखील त्यांचे सोशल मीडियावरील फॉलोअर्स वाढवण्याच्या मागे लागले आहेत. फॅन्सशी जोडले जाण्याचे आणि त्यांच्याशी गप्पा मारण्याचे साधन म्हणजे सोशल मीडिया असे समीकरण झाले आहे. कलाकार तर प्रसिद्ध होतातच पण त्याचबरोबर काही सामान्य नागरिक देखील सोशल मीडियामुळे रातोरात स्टार होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशीच एक व्यक्ती सध्या प्रसिद्धी झोतात आहे. या व्यक्तीने गायलेलं बाहुबलीमधील (Bahubali) गाण ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फेसबुकवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना हे भन्नाट गाणं गाणाऱ्या व्यक्तीबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

(हे वाचा-तिसऱ्या मजल्यावरून लटकत होता 3 वर्षांचा चिमुरडा, तेवढ्यात आला डिलिव्हरी बॉय)

गाणं गाणाऱ्या या इसमाचा व्हिडीओ फेसबुकवर हेमू गमेती भील नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या इसमाभोवती काही माणसं गराडा घालून बसली आहेत आणि ते त्याला 'बाहुबली' मधील गाणं गाण्याची फर्माइश करत आहेत. त्यानंतर हा इसम त्याच्या कमाल आवाजात गाणं सुरू करतो आणि रसिक त्याचं गाणं अत्यंत मंत्रमुग्ध होऊन ऐकत आहेत. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाख वेळा शेअर करण्यात आला आहे तर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

या व्हिडीओला फेसबुकवर 5.9 मिलियन वेळा पाहिला गेला आहे. या तरूणाने 2015 साली आलेल्या बाहुबलीमधील 'कौन है वो' गाणं म्हटलं आहे. कैलाश खेरने गायलेलं गाणं या युवकाने म्हटल्यावर त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यामध्ये तो कैलाश खेर यांच्यासारखं हुबेहूब गाण्याचा प्रयत्न करत आहे. या युवकाचे नाव अद्याप कळलं नसलं तरी ज्या वेगाने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यावरून लवकरच त्याचं नाव देखील कळेल.

First published: May 29, 2020, 7:33 PM IST

ताज्या बातम्या