असा चालक होणे नाही! ड्रायव्हिंगचा हा जबरदस्त VIDEO पाहून येईल अंगावर काटा हा बिबट्या इतका हळू आणि सावधपणे पुढे चालत राहतो की हरणाला जराही आवाज ऐकू जात नाही आणि हे हरीण गवत खाण्यातच मग्न राहातं. मध्ये एक- दोन वेळा हरणाला असं जाणवतंही की कोणीतरी त्याच्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे. हे हरीण वरती मान करून इकडे-तिकडे पाहू लागतं. मात्र, बिबट्याच्या हुशारीपुढे त्याला काहीच अंदाज येत नाही. इकडे बिबट्या इतका शांतपणे हरणाचा पाठलाग करत आहे, की तो हरणाच्या अगदी जवळ जातो, तरीही हरणाला याची भनक लागत नाही. काही वेळानंतर हरीण पुन्हा गवत खाऊ लागतं आणि इतक्यात बिबट्या त्याच्यावर हल्ला करतो. हरणाला स्वतःला वाचवण्याची संधीही मिळत नाही आणि बिबट्या त्याचा फडशा पाडतो. हा व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांनी ही हरणाची चूक असल्याचं म्हटलं आहे. समोर संकट असल्याचं जाणवत असतानाही हरणानं याकडे दुर्लक्ष केलं आणि याच कारणामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला, असं अनेकांनी कमेंट करत म्हटलं, तर अनेकांनी बिबट्यानं केलेल्या या शिकारीचं कौतुक केलं आहे.Life in #wilderness is full of challenges and uncertainties.. Both for Prey and Predator..#JungleLife @susantananda3 VC:SM pic.twitter.com/AMajUqmPzI
— Surender Mehra IFS (@surenmehra) August 11, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Leopard, Shocking video viral