मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्याला घाबरून खांबावर चढलं मांजराचं पिल्लू, पुढे काय झालं? पाहा VIDEO

कुत्र्याला घाबरून खांबावर चढलं मांजराचं पिल्लू, पुढे काय झालं? पाहा VIDEO

रस्त्यातील कुत्र्याला पाहून मांजराचं पिल्लू इतकं घाबरलं की ते चक्क वीजेच्या खांबावर चढलं. मात्र त्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.

रस्त्यातील कुत्र्याला पाहून मांजराचं पिल्लू इतकं घाबरलं की ते चक्क वीजेच्या खांबावर चढलं. मात्र त्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.

रस्त्यातील कुत्र्याला पाहून मांजराचं पिल्लू इतकं घाबरलं की ते चक्क वीजेच्या खांबावर चढलं. मात्र त्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.

  • Published by:  desk news

फतेहाबाद, 13 डिसेंबर: कुत्र्याला (Dog) पाहून आपला जीव वाचवण्यासाठी एक मांजराचं पिल्लू (Kitten) वीजेच्या खांबावर (Electric poll) चढलं. त्याच्या जवळून हाय टेन्शन वायर (High tension wire) जात असल्यामुळे त्याच्या जीवाला धोका (Threat to life)a निर्माण होत होता. साधारणतः परदेशात पाळीव प्राण्यांविषयी मोठी भूतदया दाखवली जाते. भारतातदेखील संकटात अडकलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी अनेकजण धावून आल्याचं दिसतं. लोक आपापली कामं बाजूला ठेऊन प्रसंगी त्या प्राण्याचा जीव वाचवण्यात पुढाकार घेताना दिसतात. वीजेच्या खांबावर चढलेल्या मांजराच्या पिल्लाला पाहून त्या भागातील नागरिकांची भूतदया जागृत झाली आणि त्यांनी मांजराची सुटका करण्याचा चंग बांधला. " isDesktop="true" id="642995" >

वीज कंपनीला केला फोन

ही घटना आहे हरियाणातील फतेहाबादमधील. कुत्र्याला घाबरून वीजेच्या खांबावर चढलेल्या मांजराला सर्वात मोठी भीती होती ती हायटेन्शन वायरपासून. खांबावरून जर या मांजराच्या पिल्लाने वायरवर उडी मारली असती, तर क्षणार्धात वीजेचा जोरदार झटका लागून त्याचा जीव गेला असता. त्यासाठी नागरिकांनी या परिसरातील वीज मंडळाच्या कार्यालयात फोन करून घटनेची कल्पना दिली. त्यानंतर वीज मंडळाचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.

अधिकाऱ्यांनी केली सुटका

वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हायटेन्शन वायरमधून जाणारा विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे मांजराला शॉक बसण्याची शक्यता निवळली. त्यानंतर त्यांनी खांबाच्या शेजारी शिडी लावून मांजराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अधिकारी स्वतः वर चढले आणि त्यांनी अलगद मांजराच्या पिल्लाला हातात घेतलं. मांजराचा जीव वाचल्याचं पाहून सर्व उपस्थितांनी आनंदानं टाळ्यांचागजर केला.

हे वाचा- सोशल मीडिया स्टारची आत्महत्या; ट्रोलिंगमुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

मांजराला भीती

या प्रकारामुळे मांजराचं पिल्लू चांगलंच घाबरलं होतं. काही वेळ त्याला गोंजारल्यानंतर ते शांत झालं. अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे खाली उतरवलं आणि सोडून दिलं. त्यानंतर ते आपल्या मार्गानं निघून गेलं. सुमारे दोन तास चाललेल्या या प्रकारानंतर नागरिकांनाही हायसं वाटतं. सध्याच्या धावपळीच्या जगात भूतदया अजूनही जिवंत असल्याची प्रचिती या घटनेच्या निमितानं सर्वानाच आली.

First published:

Tags: Cat, Dog, Electricity, Video viral