Home /News /viral /

जपानी यूट्यूबरचं 'वडापाव प्रेम'; मुंबईच्या रस्त्यावरील आजोबांसाठी केलं कौतुकास्पद काम, मन जिंकणारा VIDEO

जपानी यूट्यूबरचं 'वडापाव प्रेम'; मुंबईच्या रस्त्यावरील आजोबांसाठी केलं कौतुकास्पद काम, मन जिंकणारा VIDEO

या घटनेत कोकी शिशिदो नावाचा एक जपानी यूट्यूबर मुंबईच्या रस्त्यावर फिरत होता. यावेळी त्याने स्वतःसाठी वडापाव खरेदी केला. मात्र पुढे त्याने जे काही केलं ते मन जिंकणारं होतं. ( Viral Video)

  मुंबई 04 ऑगस्ट : सोशल मीडियावर सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे भावुक करणारे तर काही मन जिंकणारेही असतात. अनेकदा आपल्याला अशा काही व्यक्तींचे व्हिडिओ पाहायला मिळतात, जे निस्वार्थीपणे अनोळखी गरजू व्यक्तीची मदत करताना दिसतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेत कोकी शिशिदो नावाचा एक जपानी यूट्यूबर मुंबईच्या रस्त्यावर फिरत होता. यावेळी त्याने स्वतःसाठी वडापाव खरेदी केला. मात्र पुढे त्याने जे काही केलं ते मन जिंकणारं होतं. मालकाने नोकरीवरून काढताच कर्मचाऱ्याने घेतला खतरनाक बदला; VIDEO VIRAL वडापाव हातात घेताच त्याला रस्त्याच्या कडेला एक वृद्ध व्यक्ती बसलेला दिसला. यानंतर यूट्यूबरने या व्यक्तीसाठी आणखी एक वडापाव खरेदी केला. याच घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आता कोकी शिशिदोने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये दिसतं की यूट्यूबरने स्वतःसाठी वडापाव खरेदी केला. यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्यक्तीसाठीही दुसरा वडापाव घेतला. यानंतर तो या व्यक्तीजवळ गेला आणि त्यांना वडापाव दिला.
  याआधीही त्याने वृद्ध व्यक्तीला जेवण दिलं असल्याचं शिशिदोनं सांगितलं. या व्यक्तीपासून दूर जाताना त्याने त्याला 'चांगला आहे ना' असा सवालही केला. यानंतर यूट्यूबर स्वतःही हा वडापाव खाताना दिसतो. हा माझा आवडता महाराष्ट्रीयन नाश्ता असल्याचं तो सांगतो. 'एक सुंदर सकाळची सुरुवात आनंदी मदतीने' असं त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. OMG! लुंगी घातलेल्या 64 वर्षांच्या आजोबांनी असं काही केलं की समोर उभा तरुणही शॉक; VIDEO पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर होत आहे. शिशिदोचं हे कृत्य नेटकऱ्यांचं मन जिंकत आहे. अनेकांनी कमेंट करून त्याच्या या कामाचं कौतुक केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Mumbai News, Viral video.

  पुढील बातम्या