Elec-widget

VIRAL VIDEO शाळेतून सुटका हवी असणारी ही चिमुरडी म्हणतेय... 'मोदी को तो एक बार हराना ही पड़ेगा'

VIRAL VIDEO शाळेतून सुटका हवी असणारी ही चिमुरडी म्हणतेय... 'मोदी को तो एक बार हराना ही पड़ेगा'

शाळेतून एक महिना तरी मला सुट्टी हवी, सुटका हवी... असं अनेक लहान मुलांप्रमाणे या छोटीला पण वाटतंय. पण ही गुजराती चिमुरडी त्यासाठी काय म्हणतेय पाहा.. धमाल VIRAL VIDEO

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : शाळेतून एक महिना तरी मला सुट्टी हवी, सुटका हवी... असं अनेक लहान मुलांना वाटतं. 'शाळेभोवती तळे साठून सुट्टी मिळेल का', इथपर्यंत बहाणे आपण चिमुरड्यांकडून ऐकले होते. पण आता ही गुजराती चिमुरडी शाळेला इतकी वैतागली आहे की ती म्हणतेय 'शाळा निर्माण करणारे माझ्यापुढे आले तर मी त्यांच्यावर पाणी टाकीन, इस्त्रीच करून टाकीन.'  एवढ्यावरच ती थांबत नाही तर 'मोदींनासुद्धा एकदा तरी हरवायलाच पाहिजे आता', असंही म्हणते. या चिमुरडीचा हा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत आणि तो अनेक वेळा शेअर झाला आहे.

एकामागोमाग एक कसे तास असतात हे ही मुलगी अगदी वैतागल्याच्या थाटात सांगते. वर म्हणते शिकणं हे पण चांगलं असू शकतं ना... पण हे शाळा निर्माण करणाऱ्याला कोण सांगणार... आम्हाला पण मजा आली पाहिजे ना शिकायला! असंही वर ऐकवते. मोदींबद्दल विचारताच नाक फुगवून म्हणते ही धीट चिमुरडी म्हणते- 'मोदी को तो एक बार हराना ही पडेगा'

तिची ती धिटाई आणि स्टाइल पाहून कुणालाही हसू येईल. म्हणूनच हा धमाल व्हिडिओ भरपूर शेअर झाला आहे. तुम्हीही हा धम्माल व्हिडिओ एकदा बघाच.

या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

काहींनी यावर गंभीरपणे व्यक्त होत शिक्षणव्यवस्था आणि परीक्षापद्धतीवर टीकाही केली आहे.

तर काहींनी या व्हिडिओची फक्त मजा घेतली आहे आणि मोदीजी ऐकलंत का असंही विचारलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...