• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: 'आधी इथून निघ'; लस घेण्यासाठी गेलेल्या तरुणीनं घातला भलताच गोंधळ, डॉक्टरही वैतागले

VIDEO: 'आधी इथून निघ'; लस घेण्यासाठी गेलेल्या तरुणीनं घातला भलताच गोंधळ, डॉक्टरही वैतागले

लस (Vaccine) घेताना घाबरणाऱ्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

 • Share this:
  नवी दिल्ली 04 मे : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटने (Second Wave of Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. देशात दररोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. याच दरम्यान कोरोना आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आता 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जात आहे. अशात इंजेक्शन घेताना घाबरणाऱ्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहेत. असाच आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. यात एक तरुणी लस (Vaccine) घेण्यासाठी गेली आहे, मात्र ती इतकी घाबरत आहे, की डॉक्टरही अक्षरशः हैराण झाले आणि इंजेक्शन देताच इथून निघ, असं म्हणत तिला बाहेर काढलं. ट्विटरवर लॉजिकल थिंकर नावाच्या एक यूजरनं या घटनेचा व्हिडिओ 3 मे रोजी शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय 7 हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. तर, तीन हजाराहून अधिकांनी रिट्विटही केला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे, की ही मुलगी खुर्चीवर बसली आहे. डॉक्टर हातामध्ये इंजेक्शन घेऊन जवळ येताच ती तरुणी घाबरते आणि एक मिनिट थांबण्यासाठी सांगते. नर्स तिला पकडून ठेवतात. यानंतर ती जोरानं ओरडू लागते. शेवटी वैतागून डॉक्टर तिला जाण्यासाठी सांगगात. यानंतर ती डॉक्टरला लस देण्यासाठी म्हणू लागते. डॉक्टर इंजेक्शन देऊ लागताच ती विचारते, की मम्मी म्हणून तर ओरडू शकते ना. यावर उत्तर देत डॉक्टर सांगते, की काहीच बोलू नको, शांत बस. इंजेक्शन देताच डॉक्टर तिला रागावून इथून निघ असं सांगतात. देशात 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यात 18 वर्षावरील सर्वजण लस घेऊ शकतात. यासोबतच 45 हून अधिक वय असणाऱ्यांनाही मोफत लस दिली जात आहे. अनेक राज्यांनी लसीकरणाला सुरुवात होण्याआधीच हात वर केले होते, आपल्याकडे लसीचा साठाच नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अशात आता 1 मे रोजी 18 वर्षावरील एक लाखापेक्षाही कमी जणांना लस दिली गेल्याचं समोर आलं आहे. 1 मे रोजी 18 ते 44 वयोगटातील 84,599 जणांना कोरोनाची लस मिळाली आहे. यासाठी 28 एप्रिलपासूनच रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी कोविन पोर्टलवरुन 1 कोटीहून अधिकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं.
  Published by:Kiran Pharate
  First published: