PM काकांनी काय सांगितलं? घराबाहेर पडणाऱ्या बाबांना दम देणाऱ्या चिमुरडीचा VIDEO व्हायरल

PM काकांनी काय सांगितलं? घराबाहेर पडणाऱ्या बाबांना दम देणाऱ्या चिमुरडीचा VIDEO व्हायरल

लॉकडाऊनचा नियम मोडून घराबाहरे पडण्याचा विचार करताय? मग हा VIDEO पाहाच.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 एप्रिल : भारताता दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या काळात लोकांना घराबाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. केवळ किराणा आणि औषधांची दुकाने खुली ठेवण्यात आली आहे. असे असले तरी, अद्याप लोकांना या गोष्टीचे गांभीर्य कळलेले नाही. त्यामुळं अजूनही लोकं रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यासाठी पोलिसांनाही रस्त्यावर उतरावे लागले. अशा लोकांचा धडा शिकवणाऱ्या एका चिमुरडीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

लॉकडाऊनमध्ये या मुलीचे वडिला घराबाहेर जात होते, त्यांना अडवण्यासाठी ही चिमुरडी दारासमोर जाऊ उभी राहिली. या चिमुरडीचे सोशल मीडियावर जोरदार कौतुकही होत आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खंडू यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 21 दिवसांच्या लॉकडाऊन केल्यानंतरही तिचे बाबा नियम तोडून घराबाहेर जात होते. त्यांना तिने घरी राहण्याचे आवाहन केले.

वाचा-11 नाही फक्त 1 खेळाडू! असा क्रिकेटचा सामना तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा VIDEO

15 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ही मुलगी आपल्या वडिलांना, PM काकांनी सांगितले आहे बाहेर जाऊ नका, नाही तर कोरोनाव्हायरस येईल. बाहेर जाऊ नका. यावर तिचे बाबा मला जाऊदे असे म्हणतात. त्यावर मुलगी त्यांच्यावर चिडते आणि कुठे जायचे नाही, असा दम देते.

वाचा-काय ही हालत! पाकमध्ये ATMमधून चोरलं सॅनिटायझर, अजब चोरीचा CCTV VIDEO व्हायरल

वाचा-लॉकडाऊनमध्येही या कपलने पूर्ण केली 42 किमी मॅरेथॉन, पाहा कसा केला जुगाड

पेमा खांडू यांनी हा व्हिडिओ शेअर करत, “जेव्हा वडिलांनी मुलीसमोर ऑफिसला जाण्याचे निमित्त दिले तेव्हा काय झाले ते पाहा. तिने दारात उभे राहून पंतप्रधान मोदींच्या अपीलची आठवण करून दिली", असे कॅप्शन लिहिले आहे.

वाचा-लॉकडाऊनमुळे ट्रकमधील पीठाची पोती लुटण्यासाठी लोकांची तुफान गर्दी, पाहा VIDEO

मोदींनी जाहीर केलेला लॉकडाऊन हा 14 एप्रिलपर्यंत असणार आहे. दरम्यान हा कालावधी वाढवणार नाही, अशी माहिती काही दिवसांपूर्वी कॅबिनेटच्या वतीने देण्यात आली होती. मात्र भारताला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे, असे मत भारतीय शास्त्रज्ञांनी व्यक्त केले होते. त्यामुळं येत्या काळात लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या घोषणा केल्या जाऊ शकतात.

First published: April 2, 2020, 10:40 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading