• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • टायरमध्ये अडकलं हत्तीचं पिल्लू, आईने केली सुटका; पाहा SUPER CUTE VIDEO

टायरमध्ये अडकलं हत्तीचं पिल्लू, आईने केली सुटका; पाहा SUPER CUTE VIDEO

एका हत्तीच्या पिल्लाचा पाय टायरमध्ये अडकल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी धावून आलेल्या (Viral video of elephant helping her baby goes viral) हत्तीणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 ऑक्टोबर : एका हत्तीच्या पिल्लाचा पाय टायरमध्ये अडकल्यानंतर त्याच्या सुटकेसाठी धावून आलेल्या (Viral video of elephant helping her baby goes viral) हत्तीणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. माणूस असो किंवा जनावर, आईचं मुलावर असणारं प्रेम हे कायमच शुद्ध आणि (Relation between mother and child) तरल असतं. आपलं मूल संकटात असताना त्याच्यासाठी धावून जाणं, हा प्रत्येक आईचा स्थायीभाव असतो. संकटात अडकलेल्या आपल्या छोट्या हत्तीसाठी (Mother of baby elephant) धावून जाणाऱ्या त्याच्या आईचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हत्तीचा अडकला पाय हत्तीचं एक पिल्लू खेळत असताना त्याचा पाय दोरीला बांधलेल्या एका टायरमध्ये अडकला. आपला पाय सोडवून घेण्यासाठी छोट्या हत्तीनं प्रयत्न सुरू केले. काही वेळ प्रयत्न करूनही हत्तीला काही आपला पाय सोडवून घेता येईना. सहजासहजी पाय सोडवता येत नसल्याचं दिसल्यावर हे पिल्लू रागावलं आणि ओरडू लागलं. त्याचा आवाज ऐकून त्याची आई धावत आली आणि आपल्या बाळाला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. व्हिडिओ होतोय व्हायरल आपल्या मुलाची हाक ऐकून ज्या प्रकारे आई धावत आली, ते पाहून अनेकांना हा व्हिडिओ आवडतो आहे. आई धावत आल्यानंतर तिने अगोदर छोट्या हत्तीला शांत केलं. त्यानंतर हळूवारपणे त्याच्या पायातील टायर सोडवलं. टायरमधून पाय सुटल्यानंतर हत्तीचं पिलू खूश झालं आणि आईला बिलगलं. मातृप्रेमाचा हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. हे वाचा-वाढदिवसाला मलायका अरोराने अर्जुन कपूर आणि करिना कपूरसोबत केली लेट Night Party... अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात एखादी विचित्र घटना असते, कधी एखादा स्टंट असतो तर कधी काही करामती. मात्र अशा प्रकारे मातृप्रेमाची साक्ष देणारा हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीला उतरतो आहे. आतापर्यंत 90000 वेऴा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे.
  Published by:desk news
  First published: