मुंबई 03 फेब्रुवारी : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. प्राण्यांपासून ते अगदी पक्षी आणि माणसांचे देखील व्हिडीओ असतात. हे व्हिडीओ कधी खूप मनोरंजक असतात तर कधी धडकी भरवणारे असतात. पण सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. तो फार वेगळा आहे. हा प्राण्यांशी संबंधीत व्हिडीओ आहे.
माणसांप्रमाणेच प्राणीही सामाजिक असतात. त्यांना देखील आपल्या कुटुंबाची काळजी असते. त्यासाठी ते मेहनत देखील करतात. तर कधी दुसऱ्या प्राण्यांशी लढण्याची देखील ते तयारी ठेवतात.
हे ही पाहा : Viral : एका सेकंदासाठी वाचले महिलेचे प्राण, नाहीतर.... Video मधील घटना श्वास रोखणारी
आई माणसांची असो किंवा मग प्राण्यांची, ती आपल्या मुलांना मोठं करण्यात काहीही कमी ठेवत नाही. प्राण्यांची आई देखील त्यांना जीवन जगण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी शिकवते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ देखील असाच आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक हत्ती बेबी हत्तीला रस्ता ओलांडायला शिकवत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून देखील खूप प्रेम मिळालं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक हत्ती आपल्या मुलासह रस्ता ओलांडताना दिसत आहे. कधी ती उजवीकडे तर कधी डावीकडे बघत असते. ही मादी हत्ती तिच्या बाळाला प्रशिक्षण देत आहे. रस्ता ओलांडताना दोन्ही बाजूंनी पाहावे लागते हे ती शिकवत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Mother elephant seems teaching her baby how to cross the road.A sad reality Video- Santhanaraman pic.twitter.com/Nmn1mrhFvv
— Supriya Sahu IAS (@supriyasahuias) January 30, 2023
हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओला शेअर करताना त्यांनी लिहिले आहे, "आई आपल्या मुलाला रस्ता क्रॉस करायला शिकवत आहे."
हे ही पाहा : Viral : 'या' चोराला कुठे शोधायचं पोलिसांना प्रश्न ? CCTV मध्ये चोर तर दिसला पण...
व्हायरल होत असलेल्या या ट्विटला 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर ट्विटवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Social media, Top trending, Videos viral, Viral, Wild life