आता माझी सटकली! धावत्या कारवर बसला हत्ती आणि...,पाहा हा थरारक VIDEO

आता माझी सटकली! धावत्या कारवर बसला हत्ती आणि...,पाहा हा थरारक VIDEO

हत्तीचे खेळतानाचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील पण हा असा VIDEO कधीचा पाहिला नसेल.

  • Share this:

हत्ती हा सर्वात ताकदवान प्राणी म्हणून ओळखला जातो. तेवढाच हत्ती हा सर्वात आनंददायी प्राणीही आहे. इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते. त्यामुळे हत्तींना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करवून घेता येतात. मात्र जंगली हत्ती हा जेवढा लांब तेवढाच चांगला असेही म्हटले जाते. कारण जंगली हत्ती हा सर्वात जास्त रागीट मानला जातो. अशाच एका हत्तीचा राग पर्यटकांना महागात पडला.

थायलॅंडमध्ये खाओ याई राष्ट्रीय उद्यानमध्ये (Khao Yai National Park) एक विचित्र घटना घडली. या घटनेच्या व्हिडीओनं सर्वांना हैराण केले. एक हत्ती चक्क एका कारवर जाऊन बसला. कारवर हत्तीला बसलेले पाहून कारचालक एवढा घाबरला की त्यानं जोरात गाडी चालवण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. थायलॅंडच्या राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच असा प्रकार घडला.

उद्यानातील 35 वर्षीय डुए नावाचा हत्ती रस्त्यावरून चालत असताना, शेजारून जाणाऱ्या गाडीवर बसण्याचा तो प्रयत्न करू लागला. हत्ती पूर्णपणे गाडीवर बसण्याआधीच वाहनचालकानं गाडी जोरात पळवली. मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर गाडीची विंडशील्ड तुटल्यामुळं गाडी पुढे जाऊ शकली नाही. हा थरारक व्हिडीओ मागच्या गाडीतून प्रवास करणाऱ्यांनी आपल्या कॅमेरात कैद केला.

वाचा-VIDEO : KBC मध्ये पोहोचला चहावाल्याचा मुलगा, कहाणी ऐकून भारावले बिग बी!

वाचा-जखमी 'बाळाला' घेऊन माकडीण पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांचेही डोळे पाणावले

लोकल रिपोर्ट्सनुसार, ही घटना घडल्यानंतर उद्यानातील अधिकाऱ्यांनी स्थानिकांना आणि पर्यटकांना अशा परिस्थितीत काय करावे, याचे प्रशिक्षण दिले. बॅंगकॉक पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही रस्त्यानं जात असाल आणि हत्ती समोर आल्यास त्याचे फोटो काढू नका. गाडी बंद करून आतच राहा. दरम्यान या सगळ्या अपघातात हत्तीला किंवा वाहनचालकाला दुखापत झालेली नाही.

वाचा-भेटा 1300 किलोच्या ‘भीम’ला! रोजचा खुराक काजू-बदाम, खर्च 1 लाख आणि किंमत...

पश्चिम रेल्वेवर दाखल झालेल्या नव्या लोकलचा पहिला लूक, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 6, 2019 04:27 PM IST

ताज्या बातम्या