मुंबई 5 डिसेंबर : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. येथे कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. येथे लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांशी संबंधीत देखील व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक तर कधी धक्कादायक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे आणि त्याने थेट साई बाबांना फोन लावला आहे.
या लहान मुलाचा निरागसपण पाहून तुम्हाला या मुलाचं बोलणं ऐकतच राहावसं वाटेल. त्याचं बोलणं आणि स्टाईल तुम्हाला भुरळच पाडेल.
हे ही पाहा : मगरीच्या पोटात अडकला तरुण, मग मित्रांनी उचललं धक्कादायक पाऊल, Video Viral
या व्हिडीओमध्ये हा चिमुकला फोनवर बोलत आहे. पण या मुलाने थेट साई बाबांना फोन लावला आहे. तो कसे आहात असं आधी फोनवर विचारतो, पुढे तो स्वत:च काहीतरी बोलत राहातो, त्यानंतर त्याची आई त्याला येताना खाऊ आण असं सांगायला सांगत आहे. तेवढ्यात तो देखील फोनवर साई बाबांना खाऊ आणायला सांगत आहे.
View this post on Instagram
त्यामध्ये तो आधी विचारतो की काय आणाल खाऊ? त्यानंतर स्वत:च म्हणतो की काजू आण... आणि मग पुढे फोन ठेवतो असं म्हणून तो टाटा, सियू असं म्हणतो.
त्याचं हे वागणं आणि निरागसपणा लोकांना फार आवडला आहे. त्यामुळे व्हिडीओ शेअर करताच अनेक लोक त्याला अनेक लाईक आणि व्ह्यूज आले आहेत, एवढंच काय तर त्याला लोकांनी कमेंट देखील केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Social media, Top trending, Videos viral, Viral