मराठी बातम्या /बातम्या /Viral /

या हेल्थ कॉन्शियस मांजरीचा जीम पाहून येईल हसू, क्यूट Video ची सोशल मीडियावर चर्चा

या हेल्थ कॉन्शियस मांजरीचा जीम पाहून येईल हसू, क्यूट Video ची सोशल मीडियावर चर्चा

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

मांजरीने स्वत:च्या आरोग्याकडे देण्यासाठी वेळ काढला आहे आणि ती थेट येऊन पोहोचलीय जीममध्ये. पण हे एवढंच नाही बरं का, खरी गंमत तर पुढे आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Devika Shinde

मुंबई २५ नोव्हेंबर : सोशल मीडियावर कधी काय समोर येईल हे कोणीच सांगू शकत नाही. येथे रातोरात अनेक व्हिडीओ प्रसिद्धीत येतात. जे चर्चेचा विषय ठरतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. हा व्हायरल व्हिडीओ मांजरीचा आहे.

सध्याच्या काळात निरोगी राहाणे हे फारच कठीण आहे. मुळात अनिश्चित जिवनशैलीमुळे लोकांना स्वत:ला द्यायला वेळ नसतो. त्यात लोक वेळ पाळत नाहीत, शिवाय केव्हाही उठणं, काहीही खाणं या सगळ्यामुळे आरोग्याच्या निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं.

हे ही पाहा : Video : शेजारच्यांची भांडणं ऐकून कुत्र्याची वाढली क्युरॉसिटी, सरळ उठला आणि...

पण अशात मांजरीने मात्र स्वत:च्या आरोग्याकडे देण्यासाठी वेळ काढला आहे आणि ती थेट येऊन पोहोचलीय जीममध्ये. एवढंच नाही तर खरी गंमत पुढे आहे.

या व्हिडीओमध्ये असलेली मांजर ही चक्क ऍब्स येण्यासाठी व्यायाम करताना दिसते. हो हे खरं आहे... विश्वास बसत नसेल तर एखदा हा व्हिडीओ पाहा.

व्हिडीओच्या सुरुवातीला ही मांजर जीममध्ये एन्ट्री करते आणि मग पाठीवर झोपून थेट व्यायाम करायला सुरुवात करते. ती साधासुधा व्यायाम नाही तर लोक ऍब्स येण्यासाठी जे व्यायाम करतात, तेच करु लागते.

हा व्हिडीओ खूप जुना आहे. परंतू आता थंडीच्या दिवसात बरेच लोक व्यायामाला लागतात. त्यामुळेच सोशल मीडियावर हा पुन्हा एकदा ट्रेंड होत आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. मांजरीचं असं वागणं लोकांना आश्चर्यचकीत करत आहे. तर अनेकांना हे पाहाताना खुपच मनोरंजक वाटत आहे.

कदाचित जीममधील लोकांना असं काही करताना तिने पाहिलं असावं जाचं ती अनुसरण करत आहे. हा व्हिडीओ ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे. ज्यावर लोक जोरदाक कमेंट करत आहेत. तर अनेकांनी याला लाईक देखील केलं आहे.

मांजरीने तर आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी सुरुवात केली आहे. आता तुम्ही कधी लागताय कामाला?

First published:

Tags: Pet animal, Social media, Top trending, Videos viral, Viral