• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • हा VIDEO पाहून होईल बोलती बंद, वाढेल म्हशीविषयीचा आदर

हा VIDEO पाहून होईल बोलती बंद, वाढेल म्हशीविषयीचा आदर

म्हैस किती हुशार असू शकते (Viral Video of buffalo using horns to drink water goes viral) आणि ती कसा विचार करू शकते, याची प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: म्हैस किती हुशार असू शकते (Viral Video of buffalo using horns to drink water goes viral) आणि ती कसा विचार करू शकते, याची प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. हिंदी भाषेत म्हैस आणि अक्कल (Saying about intelligence of buffalo) यावरून अनेक म्हणी आहेत. काला अक्षर भैंस बराबर असो की अकल बडी या भैंस, ही म्हण असो. या सगळ्या म्हणींच्या केंद्रस्थानी म्हशीला अक्कल नसते किंवा ती कमी असते, असा मतितार्थ असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून म्हैस कशा पद्धतीनं (Buffalo drinks water from hand pump) स्वतःचं डोकं वापरून स्वतःसाठी पाणी मिळवते, हे दिसतं. काय आहे व्हिडिओत? या व्हिडिओत म्हशींचा एक कळप दिसतो. त्यातील एका म्हशीला प्रचंड तहान लागली आहे. मात्र आपली तहान भागवण्यासाठी ती कुणावरही अवलंबून नाही. ना ती हंबरून हंबरून मालकाला तहान लागल्याची सूचना देते, ना कुठल्या जलाशयाच्या शोधात इकडे तिकडे फिरत बसते. ही म्हैस स्वतःचं डोकं वापरते आणि स्वतःच्या पाण्याची सोय स्वतःच करते. अशी केली सोय व्हिडिओत एक हँडपंप दिसतो. या हँडपंपापाशी म्हैस येते आणि त्याच्या हँडलला शिंग लावून पाणी हापसते. आपल्या शिंगानं हँडपंपाचं हँडल ती वर उचलते. मग त्यातून पाणी खाली पडतं. त्यानंतर सिमेंटवर पडलेलं ते  पाणी शांतपणे पिऊन घेते. म्हशीसोबत असणारं रेडकूदेखील हे पाणी पितं. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. युजर्सच्या प्रतिक्रिया IFS दिपांशु काब्रा या हँडलवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून, ‘अब बताईए अकल बडी की भैंस?’ असा सवाल करण्यात आला आहे. त्यावर एकाने भैंस की अकल बडी है, असं उत्तर दिलं आहे. तर म्हशीनं स्वतःची अक्कल वापरल्याची प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
  Published by:desk news
  First published: