Home /News /viral /

VIDEO : चीनमध्ये नदीत बुडत होती मुलगी; ब्रिटीश राजदूतांनी झटक्यात उडी मारून वाचवला जीव

VIDEO : चीनमध्ये नदीत बुडत होती मुलगी; ब्रिटीश राजदूतांनी झटक्यात उडी मारून वाचवला जीव

चीनमधल्या ब्रिटीश उच्चायुक्तालयात हे ब्रिटीश अधिकारी UK चे राजदूत (Consul General) म्हणून नेमणुकीस आहेत. या 61 वर्षीय अधिकाऱ्याने पुढचा मागचा विचार न करता चिनी मुलीचा जीव वाचवायला नदीत उडी मारली. हे या video मध्ये स्पष्ट दिसत आहे.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर : सोशल मीडियावर सध्या एक VIDEO VIRAL होत आहे. चीनमध्ये एका पर्यटनस्थळावर नदीत विद्यार्थिनी पडली. ती जीव वाचवण्याचा आटापिटा करत असलेली अनेकांनी पाहिली. तिथल्या गर्दीने आरडा ओरडा सुरू केला. पण प्रसंगावधान राखून एक इसम झपकन उडी टाकून पाण्यात उतरला आणि त्याने त्या विद्यार्थिनीला सुखरूप बाहेर काढलं. हे धैर्य आणि प्रसंगावधान दाखवणारा शूर इसम दुसरा तिसरा कुणी नसून चीनमध्ये (China) पोस्टिंगला असलेले ब्रिटीश उच्चाधिकारी (British Consul General)आहेत. चीनमधल्या जोंगशानच्या जवळ चोंगकिंग नावाचं प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. तिथली ही घटना आहे. शनिवारी (14 नो) वीकएंडचा मुहूर्त साधून अनेक पर्यटकांनी चोंगकिंग भागात गर्दी केली होती. ब्रिटीश राजदूत स्टीफन एलिसन हेसुद्धा तिथे होते. चीनमधल्या बिटीश मिशनने UK in China हा VIDEO पोस्ट करून आपल्या अधिकाऱ्याचं जाहीररीत्या कौतुक केलं आहे. लोकांचा आरडा ओरडा ऐकून त्यांचं लक्ष त्या बुडणाऱ्या मुलीकडे वेधलं गेलं. कुणी तरी पर्यटक या सगळ्या घटनेचा VIDEO रेकॉर्ड करत होता. पण स्टीफन एलिसन यांना ती मुलगी नदीच्या दुसऱ्या टोकाला असलेली दिसली. वारंवार पाय घसरत असल्याने ती वर येऊ शकत नव्हती आणि ती नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जायला लागली. तिला पोहता येत नव्हतं. ती नदीत बुडायला लागली. हे लक्षात येताच 61 वर्षांच्या स्टीफन एलिसन यांनी शूज काढले आणि जिवाची पर्वा न करता नदीत उडी मारली.  त्या मुलीपर्यंत पोहचून तिला धरून त्यांनी किनाऱ्यावर आणलं. तेव्हा किनाऱ्यावर जमलेल्या इतर लोकांनी त्यांना मदत केली. थोडा अधिक वेळ या मुलीला मदत मिळाली नसती, तर तिचा जीव जाऊ शकला असता. या ज्येष्ठ ब्रिटीश अधिकाऱ्यांचं जगभरातून कौतुक होत आहे.
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: China

    पुढील बातम्या