झेब्रा आणि हत्तीच्या पिल्लांची जमली गट्टी, सवंगडी होऊन खेळतानाचा VIDEO सोशल मीडियावर VIRAL
सोशल मीडियावर व्हायरल होणारे प्राण्यांचे व्हिडीओ खूप गोड असण्याबरोबर एखादा चांगला संदेशही देतात. अशाप्रकारे मैत्रीचा संदेश देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
नवी दिल्ली, 05 डिसेंबर: सोशल मीडियावर (Social Media) दर दिवशी कोणतातरी व्हिडिओ व्हायरल होत असतो. प्राण्यांचे तर शेकडो व्हिडीओ ऑनलाइन पाहता येतील. काही m. या व्हिडीओमध्ये एक हत्तीचं पिल्लू (Baby Elephant) झेब्राच्या (Zebra) पिल्लाबरोबर खेळताना दिसत आहे. नेटिझन्सना हा व्हिडीओ खूपच आवडला आहे. काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडतो आहे.
हा व्हिडिओ भारतीय फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जंगलात झेब्राच्या कळपांमध्ये हत्तीचं पिल्लू उभं असल्याचे दिसून येतं. झेब्राच्या पिल्लाशी त्याची मैत्री असल्याचं या व्हिडीओतून दिसतंय. जशी लहान मुलं एकमेकांबरोबर वेळ घालवतात तसे हे दोन सवंगडी मज्जामस्ती करत आहेत.
Friendship has no survival value; rather it is one of those things that give value to survival💕 pic.twitter.com/XvFY8HsbLN
सुमारे 32 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये हत्तीचं पिलू त्याची सोंड कधी झेब्राच्या पिल्लाच्या तोंडाजवळ तर कधी मानेजवळ फिरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ एका निखळ मैत्रीचा संदेश देतो आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सुशांत नंदा यांनी अशी कॅप्शन दिली आहे की, 'मैत्रीची कोणती ही Survival Value नसते. मैत्री ही त्या गोष्टींपैकी एक आहे जी आपल्या Survival ला व्हॅल्यू देते.'
झेब्राचं पिल्लू देखील हत्तीच्या पिल्लाबरोबर मज्जा करताना दिसत आहे. प्राणीप्रेमींना तर हा व्हिडीओ आवडला आहेच, पण त्याचबरोबर इतर नेटिझन्सना देखील हा व्हिडीओ आवडत आहे. अशा प्रेमळ प्राण्यांच्या व्हिडीओंना इंटरनेट वर्ल्डमध्ये फार लोकप्रियता मिळते. प्राण्यांना खेळताना किंवा माणसांप्रमाणे वागताना पाहून सर्वांनाच मौज वाटते. त्यामुळेअसे व्हिडिओ अगदीच झपाट्याने व्हायरल होतात.