अपघातानंतर रस्त्यावर पडली होती महिला, तिच्यावरून गेली अजून एक गाडी; पाहा हा Viral Video

अपघात झाल्यानंतर मुलगी रस्त्यावर फेकली गेली. ती मुलगी पहिल्या अपघातातून उठणार तेवढ्यात तिच्यावरून दुसरी गाडी गेली.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 12:50 PM IST

अपघातानंतर रस्त्यावर पडली होती महिला, तिच्यावरून गेली अजून एक गाडी; पाहा हा Viral Video

चीनमध्ये एक असा अपघात झाला जो पाहून तिथे उपस्थित सारेच अस्वस्थ झाले होते. चीनमधील मॅंशन शहरात (Ma'anshan City) महिलेला एकाचवेळी दोन वेळा अपघाताचा सामना करावा लागला. अपघात झाल्यानंतर मुलगी रस्त्यावर फेकली गेली. ती मुलगी पहिल्या अपघातातून उठणार तेवढ्यात तिच्यावरून दुसरी गाडी गेली. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्पष्ट दिसतं की, मुलगी स्कूटर चालवत रस्ता ओलांडत होती. तेव्हाच समोरून एक टॅक्सी आली आणि तिने स्कूटरला धडक मारली.

अपघात झाल्यानंतर मुलगी रस्त्यावर पडली होती. काही सेकंदांनी तिथे एक एसयूव्ही गाडी आली आणि ती गाडी तिच्यावरून गेली. गाडी तिच्यावरून जातेय हे पाहताच लोकांनी त्या गाडीला थांबण्याचा इशारा दिला. यानंतर लोकांनी एसयूव्ही कार उचलली आणि त्या महिलेला बाहेर काढलं.

Loading...

CGTN ने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेक कमेन्ट यावर येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मुलीला फार लागलं नसून तिची प्रकृती चांगली आहे. ट्विटरवर लोकांनी तिचं नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलीस अशा कमेन्ट दिल्या आहेत. तर काहींनी गाडी चालकाची टीकाही केली. एका युझरने लिहिले की, 'महिलेचा जेव्हा अपघात झाला तेव्हा रस्त्यावर अनेक माणसं होती. ते फक्त ही घटना उभं राहून पाहत होते. कोणी तिची मदत का नाही केली. दुसऱ्यांदा तिच्यावरून गाडी जाण्याची ते वाट पाहत होते का..'

Boss Day: या 5 उपायांनी लगेच जाईल बॉसचा राग, एकदा वाचून पाहाच!

श्रीमंतांच्या यादीत Paytm चे मालक विजय शर्माचं नाव, पाहा Forbes India ची लिस्ट!

सोशल मीडियावर चर्चा फक्त या 50 वर्षांच्या आईचीच, पाहा का होतायेत तिचे PHOTO VIRAL

Facebook फाउंडर Mark Zuckerbergकडे आहे असं काही की तुम्ही हसू रोखू शकणार नाही!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 12:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...