Home /News /viral /

बाबो! व्यक्तीच्या अंगात येतो महिषासुर, मग खातो लाकडाचा भुस्सा अन् चारा; पाहा Video

बाबो! व्यक्तीच्या अंगात येतो महिषासुर, मग खातो लाकडाचा भुस्सा अन् चारा; पाहा Video

बाबो! व्यक्तीच्या अंगात येतो महिषासुर, मग खातो लाकडाचा भुस्सा अन् चारा; पाहा Video

बाबो! व्यक्तीच्या अंगात येतो महिषासुर, मग खातो लाकडाचा भुस्सा अन् चारा; पाहा Video

Viral Video of Man converts into Mahishasur: मागील 40 ते 45 वर्षांपासून नागपंचमीच्या दिवशी आपल्या शरीरात महिषासुराचा आत्मा प्रवेश करतो, पण इतरवेळी आपण सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत असल्याचा दावा बुधिराम यानं केला आहे.

    मुंबई, 06 ऑगस्ट: इंटरनेट, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल व्हावे म्हणून कोण काय करेल? याचा अंदाजही बांधणं कठीण आहे. मनोरंजनात्मक व्हिडिओची संख्या तर इतकी वाढली आहे की मोबाइल हाती आला की अनेक तास कसे निघून जातात याचा पत्ताही लागत नाही. या व्हिडिओंना नेटिझन्सची प्रचंड पसंती मिळत असल्याने यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इंटरनेटवर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात एक व्यक्ती म्हशीप्रमाणे लाकडाचा भुस्सा आणि चारा खाताना दिसतेय. इंटरनेटवर दिलेल्या माहितीनुसार, दर नागपंचमीला या व्यक्तीच्या अंगात महिषासुराचा आत्मा येत असल्याचं बोललं जात आहे. ‘झी सलाम हिंदी न्यूज’ ने या सदर्भात वृत्त दिलं आहे. गायी, म्हशींप्रमाणे चारा खाणाऱ्या या व्यक्तीचं नाव बुधिराम आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांच्याकडून असा प्रकार सुरू असल्याचं सांगितलं जातं. रिपोर्टनुसार, बुधिराम हे देवीच्या मंदिरासमोरील महिषासुराच्या मूर्तीसमोर बसून जनावरांप्रमाणे भुस्सा, चारा खात असतात. मागील 40 ते 45 वर्षांपासून नागपंचमीच्या दिवशी आपल्या शरीरात महिषासुराचा आत्मा प्रवेश करतो पण इतरवेळी आपण सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगत असल्याचं बुधिराम सांगतात. बुधिराम यांना पाहण्यासाठी जमते लोकांची गर्दी- एका मीडिया रिपोर्टनुसार, बुधिराम रस्ते विकास विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. कोल्हुईच्या रुद्रपूर शिवनाथ गावचे ते रहिवासी आहेत. नागपंचमीच्या दिवशी बुधिराम यांच्या अंगात महिषासुराचा आत्मा प्रवेश करत असल्याचं लोकांनाही वाटतं. या दिवशी ते चारा आणि भुस्सा खाऊ लागतात, तेव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आसपासच्या गावचे लोकही येथे हजर होत असतात. बुधिराम जिथे भुस्सा व चारा खातात तेथील भिंतीवर ‘जय बाबा भइसा सूर’ असं लिहिलेलं व्हिडिओतही दिसतं. बुधिराम हे भुश्श्याच्या टोपलीत व पाण्यात तोंड घालताना या व्हिडिओत दिसतात. हेही वाचा-15 ऑगस्टला नव्हे, ‘या’ दिवशी देशात सुरु होईल 5G सेवा; किंमतही असेल स्वस्त हा तर माणूस नव्हे पशु, लोकांनी व्यक्त केली प्रतिक्रिया- बुधिराम यांचा व्हिडिओ @mahansharma6 या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओत एक टोपली दिसत असून, यात चारा आणि पाणी टाकलेलं दिसतं. बुधिराम या टोपलीत तोंड घालून चारा खाताना व पाणी पिताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आजुबाजूचे लोक त्यांना केळी व गवत खाऊ घालताना दिसत आहेत. या व्हिडिओखाली लोक तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करत असून ही व्यक्ती माणूस नव्हे पशु असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे. दरम्यान, दरदिवशी सोशल मीडिया असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात मनोरंजनात्मक व्हिडिओला नेटिझन्सची चांगलीच पसंतीही मिळते. अनेक जणांच्या मते, बुधिराम यांची कृती अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी असू शकते. पण हा प्रकार पाहून लोकांचं चांगलंच मनोरंजन होत आहे.
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral video on social media, Viral video.

    पुढील बातम्या