आजीबाई जोरात..! 93 व्या वाढदिवशी Aankh Maarey गाण्यावर धमाल डान्स, पाहा VIDEO

आजीबाई जोरात..! 93 व्या वाढदिवशी Aankh Maarey गाण्यावर धमाल डान्स, पाहा VIDEO

तुमच्या उत्साहाला आणि आनंदाला वयाची मर्यादा नसते हेच खरं! आणि हे सिद्ध केलंय या आजीबाईंनी. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे.

  • Share this:

कोलकाता, 17 ऑगस्ट : तुमच्या उत्साहाला आणि आनंदाला वयाची मर्यादा नसते हेच खरं! आणि हे सिद्ध केलंय या आजीबाईंनी. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ नेटकऱ्याची पसंती मिळवत आहे. या आजीबाईंचा हा व्हिडीओ कोलकातामधील आहे. हा व्हिडीओ हजारो लोकांनी फेसबुकवर रिशेअर केला आहे तर काही लाख लोकांनी पाहिला आहे. यामध्ये एक आजीबाई त्यांचा वाढदिवस एन्जॉय करताना बॉलिवूडमधील गाण्यावर थिरकत आहेत.

एखाद्या लहान मुलीच्या वाढदिवसाप्रमाणे या बर्थडे पार्टीमध्ये देखील सर्वकाही होते- केक, बर्थडे हॅट्स आणि फुगे सुद्धा. पण या साऱ्यामध्ये आकर्षणाचा विषय होता आजीबाईंचा डान्स परफॉरमन्स. या पार्टीमध्ये या 93 वर्षीय आजीबाईंनी चक्क रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि सारा अली खानच्या (Sara Ali Khan) सिंबा (Simmba) सिनेमातील आँख मारे (Aankh Maarey) या गाण्यावर डान्स केला आहे. तो ही अगदी त्यांच्या स्टाइलमध्ये.

या आजीबाईंचे काही क्यूट फोटो देखील त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियवर शेअर केले आहेत. यामध्ये देखील आजींनी 'Birthday Girl' प्रमाणे पोज दिल्या आहेत. या आजींनी बर्थडे हॅट घालून फोटो देखील काढले आहेत. एकूणच काय या आजींचा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

या आजीबाई सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. त्याचा परफॉरमन्स भल्याभल्यांना लाजवणारा आहे. असा उत्साह सर्वांमध्ये कायम राहावा अशा कमेंट्स त्यांच्या या व्हिडीओवर केल्या जात आहेत. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ जवळपास 5000 पेक्षा जास्त वेळा शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडीओला 6 लाखांपेक्षा जास्त Views मिळाले आहेत.

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 17, 2020, 1:32 PM IST

ताज्या बातम्या