Video : सिनेमातील पात्र प्रत्यक्षात, आफ्रिकेतल्या जंगलात सापडला मोगली!

Video : सिनेमातील पात्र प्रत्यक्षात, आफ्रिकेतल्या जंगलात सापडला मोगली!

जंगलबुक (Jungle Book) सिनेमात मोगली (Mogli) नावाचे एक पात्र होते. हा मोगली मनुष्य असूनही जनावरांच्यामध्ये राहतो. त्यांच्यासोबतच मोठा होतो. लेखकाने कल्पनेत रंगवलेले हे पात्र प्रत्यक्षातही अस्तित्वात आहे.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर:  'जंगल-जंगल बात चली है पता चला है....' हे गाणं तुम्हाला माहिती असेलच. हे गाणं ज्या सिनेमात आहे तो जंगलबुक (Jungle Book) सिनेमा देखील सर्वांच्या चांगलाच आवडीचा आहे. जंगलबुक सिनेमात मोगली (Mogli) नावाचे एक पात्र होते. हा मोगली मनुष्य असूनही जनावरांच्यामध्ये राहतो. त्यांच्यासोबतच मोठा होतो. लेखकाने कल्पनेत रंगवलेले हे पात्र प्रत्यक्षातही अस्तित्वात आहे, असं  सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे...

होय, मोगली सारखं जंगली प्राण्यांसोबत वावरणारे पात्र प्रत्यक्षात आहे. रवांडातल्या जंगलात ती व्यक्ती राहते. त्या व्यक्तीचे नाव ऐली असून तो मायक्रोसेफली या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीचे डोके शरिराच्या अन्य भागापेक्षा मोठे असते. ऐलीला हा आजार लहानपणापासूनच आहे. या आजारामुळे तो त्याचा बहुतेक काळ लोकांपासून दूर जंगलात एकटा घालवतो. त्यामुळे लोक त्याला मोगली म्हणून ओळखतात.

हे ही वाचा-UN चा ऐतिहासिक निर्णय! ड्रग्जच्या यादीतून Cannabis हटवले; 27 देशांचा पाठिंबा

मोगलीची अफाट कौशल्ये!

आफ्रिकेच्या जंगलात राहणारा हा मोगली शारीरिक आजाराने ग्रस्त आहे. पण, त्यामुळे त्याच्या शिकण्याच्या वृत्तीवर काही परिणाम झालेला नाही. त्याने जंगलात राहून अनेक कौशल्य आत्मसात केली आहेत. तो कित्येक किलोमीटर चालत जावू शकतो. त्याचबरोबर डोळ्यांची पापणी लवण्याच्या आत उंच झाडावर चढतो. मोगलीची पाच भावंडे जन्मानंतर लगेच दगावली. “त्याचे देखील डोके मोठे आहे. त्यामुळे त्याला ऐकायला आणि बघायला त्रास होतो. त्याची शारीरिक ठेवण वेगळी असल्याने लोकांनी त्याला भरपूर त्रास दिला. या त्रासामुळेच तो कधी शाळेत गेला नाही.”, असे त्याच्या आईने सांगितले.

मोगलीच्या आयुष्याची ही व्यथा समजल्यानंतर लोकांनी त्याला मदत करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या मदतीमधून 3958 डॉलर म्हणजेच 2.92 लाख रुपये जमा झाले आहेत. या पैशांमुळे मोगलीच्या कुटुंबाचा जगण्याचा संघर्ष काही प्रमाणात कमी झाला आहे.

Published by: News18 Desk
First published: December 3, 2020, 6:18 PM IST

ताज्या बातम्या