मराठी बातम्या /बातम्या /Viral /

उडी मारून बसला पाठीवर...व्हेल माशावरून तरुणानं केली सफर, पाहा VIDEO

उडी मारून बसला पाठीवर...व्हेल माशावरून तरुणानं केली सफर, पाहा VIDEO

हा व्हिडीओ 14 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांची या तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलंय

हा व्हिडीओ 14 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांची या तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलंय

हा व्हिडीओ 14 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेकांची या तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलंय

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 21 ऑगस्ट : प्राण्यांना गाडीला जुंपल्याचं ऐकलं आहे, प्राण्यांवर बसून प्रवास केल्याचं पाहिलं आहे पण माशाच्या पाठीवर बसून प्रवास केल्याचं कधी पाहिलंय का? पण असं खरंच घडलं आहे. एका तरुणानं धाडस करून व्हेल माशाच्या पाठीवर उडी मारली आणि सवार होऊन पाण्यात प्रवास करू लागला. या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा तरुण बोटीतून प्रवास करत असताना व्हेल शार्क माशाच्या पाठीवर उडी मारण्याचं धडस करतो. आधी उडी चुकू नये म्हणून एकदोन वेळा अंदाजही घेतो आणि मग ही उडी मारतो. व्हेड शार्क मासाही थोडा वेगानं त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न करतो मात्र तोपर्यंत तरुण माशाचे कल्ले पकडून त्याच्यावर नियंत्रण मिळवतो आणि त्याच्यावरून प्रवास करतो. हे वाचा-..आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL हे वाचा-रस्त्याच्या दुतर्फा आग, अंगावर ठिगण्या उडत असूनही त्यानं गाडी थांबवली नाही! हा व्हिडीओ 16 ऑगस्टला शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ 14 हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक युझर्सनी या तरुणाच्या धाडसाचं कौतुक केलं आहे तर काही नेटकऱ्यांनी मात्र टीकेची झोट उठवली आहे. अशा पद्धतीनं माशांना त्रास दिल्यानं ते हल्ला करतात असंही काही युझर्सनी म्हटलं आहे. तर काहींनी हा निव्वळ मूर्खपणा असल्याची प्रतिक्रिया या व्हिडीओला दिली आहे.
First published:

Tags: Viral video.

पुढील बातम्या