मुंबई 30 नोव्हेंबर : सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यांपैकी काही व्हिडिओज मनोरंजक, तर काही व्हिडिओज धक्कादायक असतात. पती-पत्नीच्या वादविवादावरचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर पाहायला मिळतात. काही वेळा पती-पत्नीतलं भांडण, स्पर्धा विकोपाला गेल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर एका जोडप्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत एक व्यक्ती त्याच्या पत्नीला ट्रॅक्टर चालवायला शिकवत आहे; मात्र एका क्षणी पत्नीचा ट्रॅक्टरवरचा ताबा सुटतो आणि भीषण अपघात होतो. या अपघातात पती गंभीर जखमी झाल्याचं दिसत आहे. हा प्रसंग नेमका कसा घडला, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे त्याविषयी जाणून घेऊ या.
नको ते साहस करायच्या नादात एक जोडपं कशा पद्धतीने अडचणीत सापडलं, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. Best Videos ने ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दहा लाख व्ह्यूज मिळाले असून, 17 हजार लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून काही जणांनी त्यावर विनोदी कमेंट्स केल्या आहेत.
पती आणि पत्नीतलं भांडण आणि स्पर्धा हा कधीही न संपणारा विषय आहे. काही वेळा एखाद्या गोष्टीमुळे ही स्पर्धा थांबते किंवा त्यातून काही तरी वेगळंच निष्पन्न होतं, असं काहीसं या व्हिडिओमधून पाहायला मिळत आहे. वीकेंडच्या निमित्ताने पती पत्नीसोबत खास क्षण घालवण्यासाठी विचार करत असतो. त्यासाठी खाण्या-पिण्यासह सर्व गोष्टींची अॅरेंजमेंट करतो.
Teaching the wife to drive ♂️ pic.twitter.com/4cqEYJazcc
— Best Videos (@_BestVideos) October 9, 2022
आपल्या मित्रांनाही बोलावतो. घरी एका लहानशा पार्टीचं आयोजन करतो. पार्टीत एखादी साहसी गोष्ट करण्याचा सल्ला पत्नी तिच्या पतीला देते. पत्नी ट्रॅक्टर शिकण्याविषयी बोलत असल्याचं पतीच्या लक्षात येतं. यासाठी पती तयार होतो. सगळे जण घराबाहेर येतात. पती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत तर पत्नी ड्रायव्हर सीटवर बसते. पती पत्नीला ट्रॅक्टर चालवण्याविषयी माहिती देऊ लागतो.
पत्नी ट्रॅक्टर चालवत एक राउंड योग्य पद्धतीने पूर्ण करते. तेव्हा पती तिला वेग वाढवण्याविषयी माहिती देऊ लागतो. माहिती जाणून घेऊन पत्नी ट्रॅक्टरचा वेग वाढवू लागते. तेवढ्यात पती त्याच्या पत्नीला ट्रॅक्टरचा वेग कमी करण्यास सांगतो; मात्र पत्नी गोंधळून जाते आणि काही अंतरावर तिचा ट्रॅक्टरवरचा ताबा सुटतो.
ट्रॅक्टरवरचा ताबा सुटल्याने भीषण अपघात होतो. पती ट्रॅक्टरच्या ट्रॉलीतून दूरवर फेकला जातो. या अपघातात पती गंभीर जखमी होतो, असं या व्हिडिओत पाहायला मिळतं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्सदेखील केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shocking video viral, Top trending, Videos viral, Viral