भोजपूर, 30 नोव्हेंबर : ज्या वयात हातात पुस्तक घेऊन शिकण्याची धडपड करायची अशा परिस्थितीत गुंडगिरी करत असलेल्या एक युवकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तरुण खूप नशेत असल्याचं दिसत आहे. नशेत धुंद होऊन हातात कट्टा आणि पिस्तूल घेऊन बारबालांसोबत ठुमके लगावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायर झाला आहे.
लग्न समारंभांमध्ये हवेत गोळीबार आणि गावठी कट्टे आणि पिस्तूल घेऊन नाचत असल्याचा घटना सातत्यानं समोर येत आहेत. भोजपूर इथे अशा घटनेत एकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्यानंतर आणखीन एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ जिल्ह्यातील सिकरहाटा पोलीस ठाणा परिसरातील सिकरौळ गावचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता डान्स करणाऱ्या तरुणीसोबत नशेत धुंद होऊन हातात पिस्तूल घेऊन तरुण स्टेजवर डान्स करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
हे वाचा-भिकारी समजून शोरूममधून बाहेर काढलं, त्याच व्यक्तीने विकत घेतली 12 लाखांची बाईक
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की युवक हातात वेगवेगळी शस्त्र घेऊन डान्स करत आहे. हा तरुण अल्पवयीन असल्याचं देखील दावा केला जात आहे. तर मध्येच हा तरुण हवेत गोळीबार करत आहे. अवघ्या 3 किमी अंतरावर पोलीस ठाणं असून देखील पोलिसांना या घटनेची माहिती नव्हती. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली.
कार्यक्रमात तरुण दारूच्या नशेत धुंद होऊन डान्स करत होता. पोलिसांची त्याला भीतीच नसल्यासारखं वागत होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन तरुणांना शस्त्रांसह अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Viral news