कल्याण, 12 सप्टेंबर : राज्यभरात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात पावसाने धुमशान घातले आहे. कल्याणमध्ये दमदार पावसाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दुर्गाडी चौकात वीज झाडावर पडली आहे.
वीज झाडावर पडतानाचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कल्याणच्या दुर्गाडी चौकात वीज पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शुक्रवारी कल्याण परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. त्यातच अचानक दुर्गाडीच्या चौकात वीज पडली, ही घटना शुक्रवारची असल्याचं बोललं जातं आहे.
मात्र व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कधीचा आहे? याची अधिकृत पुष्टी होऊ शकलेली नाही.
दुर्गाडी चौकातील एका इमारतीतून हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती ही बाहेर मस्त पाऊस पडत असतानाचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करत होता. नेमके त्यावेळीच एक वीज थेट चौकातील झाडावर कोसळली.
वीज कोसळल्यामुळे अचानक मोठा आवाज झाला. त्यामुळे मोबाइल फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करणारा तरुण घाबरला आणि रूमच्या खिडकीतून दूर पळला. अवघ्या काही सेंकदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अशीच एक घटना गुजरातमध्ये जून महिन्यात घडली होती. अंगावर शहारे आणणारा हा थरारक व्हिडिओ गुजरातमधील पालीताना या परिसरातील असल्याची माहिती समोर आली. या व्हिडिओमध्ये झाडावर वीज कशी कोसळते ते दिसत आहे.
Nisarga cyclone वीज कोसळून झाडाला आग, पाहा थरारक VIDEO pic.twitter.com/xxPwVxqFMR
— News18Lokmat (@News18lokmat) June 3, 2020
निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम हे गुजरातमध्ये दिसायला लागले होते. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला होता. खबरदारी म्हणून सागरी किनाऱ्यालगच्या गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. नेमकं त्याचवेळी एका झाडावर ही वीज कोसळली होती.