मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कोरोनामुळे वडील गमावलेल्या मुलीला लग्नात मिळालं खास गिफ्ट,VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

कोरोनामुळे वडील गमावलेल्या मुलीला लग्नात मिळालं खास गिफ्ट,VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

भावाने बहिणीला लग्नाच्या वेळी (Sister Marriage) असं अनोखं गिफ्ट दिलं, की सगळेच थक्क झाले. हा व्हिडीओ पाहणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

भावाने बहिणीला लग्नाच्या वेळी (Sister Marriage) असं अनोखं गिफ्ट दिलं, की सगळेच थक्क झाले. हा व्हिडीओ पाहणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

भावाने बहिणीला लग्नाच्या वेळी (Sister Marriage) असं अनोखं गिफ्ट दिलं, की सगळेच थक्क झाले. हा व्हिडीओ पाहणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येत आहे.

मुंबई, 29 जून : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत असतात. हृदयाला भिडणाऱ्या व्हिडिओजना अधिक पसंती मिळते. ते मोठ्या प्रमाणात शेअर होतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भावाने बहिणीला लग्नाच्या वेळी (Sister Marriage) असं अनोखं गिफ्ट दिलं, की सगळेच थक्क झाले. हा व्हिडीओ पाहणाऱ्या सर्वांच्या डोळ्यात पाणी येत आहे. कोरोनाने (Corona) अनेकांचं सर्वस्व हिरावून घेतलं. हैदराबादमधल्या अवुला सुब्रमण्यम यांचा गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता. 9 जून रोजी त्यांची मुलगी वैष्णवी हिचं लग्न होतं. या आनंदाच्या प्रसंगी वडील हजर असते, तर किती बरं झालं असतं, असा विचार प्रत्येक जण करत होता; मात्र ही उणीव भरून निघाली. कारण वैष्णवीचा भाऊ फणी कुमार याने वडिलांचा मेणाचा पुतळा आपल्या बहिणीला भेट दिला. तो अगदी हुबेहूब होता. असं हे सरप्राइज गिफ्ट पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. एका वर्षापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वडिलांच्या पुनर्भेटीचा आनंद त्यातून मुलीला मिळाला. त्याने बनवून घेतलेला हा मेणाचा पुतळा त्याचे वडील अवुला सुब्रमण्यम यांच्यासारखाच अगदी हुबेहूब दिसतो. लग्नाच्या वेळी बहिणीला वडिलांची उणीव भासू नये म्हणून भावाने ही अनोखी भेट दिली. हा पुतळा पाहून तिथले सगळेच आश्चर्यचकित झाले. वधूच्या वेशात बसलेल्या मुलीच्या आणि जवळ उभ्या असलेल्या आईच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते. 'एनडीटीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ हैदराबादचा आहे. सई वैष्णवी नावाच्या तरुणीचं लग्न होतं. प्रत्येक जण आनंदी होता; पण सर्वांना मुलीच्या वडिलांची आठवण येत होती. ते गेल्या वर्षी कोरोनामुळे गेले; मात्र साई वैष्णवीचा भाऊ फणी कुमार याने अशी भेट दिली, की तशी यापूर्वी कोणीच दिली नसेल. या व्हिडिओला यू-ट्यूबवर (Youtube) 80 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 3.39 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये असं दिसतं, की आपल्या वडिलांना पाहताच साई वैष्णवी खूपच भावूक होते आणि तिला अश्रू अनावर होतात. तिची आई जयश्रीही अचानक आपल्या पतीला समोर पाहून आश्चर्यचकित होते आणि नंतर त्यांनाही रडू कोसळते. वैष्णवी वडिलांच्या पुतळ्याला मिठी मारताना दिसत आहे. लग्नाला उपस्थित असलेल्या इतर नातेवाईकांनीही पुतळ्याला मिठी मारली आणि ते भावूक झाल्याचं व्हिडिओत आहे. हा सगळाच प्रसंग, खूपच भावनिक असल्याने खूप पाहिला जात असून, सोशल मीडियावर (Social Media) शेअर होत आहे. VIDEO - पाण्यात बोट चालवत होती व्यक्ती, काही क्षणातच मगरीच्या जबड्यात गेली; थरकाप उडवणारं दृश्य कॅमेऱ्यात कैद याबाबत वधूचा भाऊ फणीने मुलाखतीत सांगितलं, की त्याचे वडील बीएसएनएलमध्ये काम करायचे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांची ऑक्सिजन पातळी खूपच कमी झाली होती. तीन दिवस ते रुग्णालयात होते. ते व्हेंटिलेटरवर असल्याने त्यांना कोणीही भेटू शकलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंब हादरून गेलं. सर्वांना मोठा धक्का बसला होता. साई वैष्णवीच्या लग्नात त्यांची उणीव जाणवली. प्रत्येकाची एकच इच्छा होती, की लग्नात ते असायला हवे होते. ती इच्छा या मार्गाने पूर्ण झाली. हा पुतळा त्याने कर्नाटकातून बनवून घेतला. त्यासाठी एक वर्ष लागलं.
First published:

Tags: Marriage, Video viral

पुढील बातम्या