मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भरवस्तीत घुसला सिंह, वासराची मान पकडून नेलं फरफटत, पाहा शिकारीचा थरारक VIDEO

भरवस्तीत घुसला सिंह, वासराची मान पकडून नेलं फरफटत, पाहा शिकारीचा थरारक VIDEO

सिंहाची एक झडप आणि खेळ खल्लास...सिंहानं कशी केली वासराची शिकार, पाहा VIDEO

सिंहाची एक झडप आणि खेळ खल्लास...सिंहानं कशी केली वासराची शिकार, पाहा VIDEO

सिंहाची एक झडप आणि खेळ खल्लास...सिंहानं कशी केली वासराची शिकार, पाहा VIDEO

  • Published by:  Kranti Kanetkar

अमरेली, 22 ऑगस्ट : भरवस्तीत सिंहानं शिरून वासराची शिकार केल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रात्रीच्या सुमारास सिंहानं समोरून येणाऱ्या वासरावर झडप घालून त्याला ठार केलं. हा शिकारीचा थरार भरवस्तीत घडल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना गुजरातच्या अमरेली परिसरात 10 दिवसांपूर्वी घडल्याची माहिती मिळाली आहे. जाफराबाद तहसील इथे जीकाद्री गावात सिंहाचा वावर वाढला होता. एका रात्री या सिंहानं वासरावर नजर ठेवून शिकार केली आणि ताव मारला. या शिकारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे वासरू जीव वाचवण्यासाठी धडपडत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र सिंहानं त्याची मान पकडून त्याला फरफटत नेलं.

हे वाचा-...आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता आजूबाजूला दुचाकी पार्क केल्या आहेत. रात्रीच्या वेळी समोरून घाबरलेल्या स्थितीत वासरू पळत येत असताना समोरून अचनाक सिंह त्याच्यावर झेप घेतो. सिंहाच्या तावडीतून सुटण्यासाठी हे वासरू धडपड करतं मात्र प्रयत्न अपयशी ठरतात सिंह या वासराची मान धरून त्याला खाली आपटतो आणि त्याला जागीच ठार करतो. सिंहाच्या शिकारीचा हा दुर्मीळ आणि थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना 10 दिवसांपूर्वीची असल्याची माहिती समोर आली आहे.

First published:

Tags: Gujrat, Viral video.