शिकारी खुद शिकार हो गया! चक्क बेडकाने सापाला खाल्लं, पाहा थरारक VIDEO

शिकारी खुद शिकार हो गया! चक्क बेडकाने सापाला खाल्लं, पाहा थरारक VIDEO

हावरट बेडूक! जगातील सर्वाधिक विषारी असणारा साप डोळ्यादेखत गट्टम केला.

  • Share this:

09 फेब्रुवारी: साप आणि बेडकाच्या लढाईमध्ये कायम सापाचा विजय होतो. साप बेडकाला खातो हे आपल्याला माहीत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. साप आणि बेडकाच्या लढाईत चक्क सापाऐवजी बेडकानं बाजी मारली आहे. बेडकानं अवघ्या 37 सेकंदात बघता बघता सापाला गिळंकृत केलं. हे पाहायला खूप वेगळं वाटत असेल पण सत्य आहे. हा व्हिडिओ आपण पाहू शकता. या व्हिडिओमध्ये अवघ्या 37 सेकंदात जिवंत सापाला बेडकानं गिळलं आहे. बेडकाच्या तावडीतून सुटण्यासाठी सापाची धडपड सुरू आहे. मात्र बेडकानं असा काही त्याला गिळला की सापालाही या लढाईत पराभव पत्करावा लागला.

हा व्हिडिओ ऑस्ट्रेलियातील असल्याचं सांगितलं जात आहे. या हिरव्या रंगाच्या बेडकानं असे अनेक विषारी साप फस्त केले आहेत. तिथल्या एका महिलेनं आपल्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला.

ह्या व्हिडिओमधील काही छाय़ाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंगळवारी क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने ऑस्ट्रेलियालातील साप आणि बेडकाच्या लढाईतील काही दृश्यं कॅमेऱ्यात टिपली आहेत. जगातील सर्वाधिक विषारी असणारा तिसऱ्या क्रमांकावरचा साप या हिरव्या रंगाच्या बेडकानं गटट्म केला होता. या संपूर्ण प्रकार महिलेनं सोशल मीडियावर फोटोसह शेअर केला आहे.

दरम्यान 2018 रोजी एक व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. त्यानुसार या व्हिडिओला 60 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या व्हिडिओमध्येही हिरव्या रंगाचा बेडून कसा साप खात आहे हे आपण पाहू शकता. सोशल मीडियावर ह्या पोस्टच्या निमित्तानं हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.

First published: February 9, 2020, 9:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading