Tiktok साठी तरुणीचे जिन्नांच्या मजारीसमोर ठुमके, VIDEO पाहून पाकिस्तानी भडकले

Tiktok साठी तरुणीचे जिन्नांच्या मजारीसमोर ठुमके, VIDEO पाहून पाकिस्तानी भडकले

तरुणीच्या या टिक टॉक व्हिडिओमुळे सोशल मीडियावर युझर्सनी संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

कराची, 24 फेब्रुवारी: टिक टॉकची भुरळ आजच्या तरुणाईला एवढी पडली आहे की तन-मन-धन हरपून फक्त टिक टॉक व्हिडिओच्या प्रेमात आजची तरुण पिढी गुंतली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ आहे पाकिस्तानमधील कराची इथला. पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांच्या कराची इथे असलेल्या मजार समोर एका तरुणीनं डान्स करत टिक टॉक व्हिडिओ तयार केला आहे. या तरुणीच्या डान्सचा व्हिडिओ टिक टॉकच नाही तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून ही तरुणी जिन्ना यांच्या मजार समोर केवळ टिक टॉक व्हिडिओ तयार करण्यासाठी डान्स करत आहे.

सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे या तरुणीला टीकाला सामोरं जावं लागलं आहे. या व्हिडिओला विरोध दर्शवणारे ट्वीट्सही समोर येत आहेत. तर मजार इथे तैनात असलेले सुरक्षारक्षक काय करत होते? असा सवालही युझर्सनी उपस्थित केला आहे. सुरक्षारक्षक आणि तरुणीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी युझर्सनी केली आहे. तर अशा पद्धतीनं टिक टॉक व्हिडिओ करणं चुकीचं आहे किमान काळ आणि वेळेचं भान राखायला हवं असं युझर्सचं म्हणणं आहे. युझर्सनी संताप व्यक्त केला आहे मात्र प्रत्यक्षात आता काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: February 24, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या