मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एक मुलगा अन् 2 तरुणी, सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी, नागपुरातला LIVE VIDEO

एक मुलगा अन् 2 तरुणी, सुरू झाली फ्री स्टाईल हाणामारी, नागपुरातला LIVE VIDEO

नागपूर शहरात फुटाला चौपाटीवर दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना समोर आली आहे.

नागपूर शहरात फुटाला चौपाटीवर दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना समोर आली आहे.

नागपूर शहरात फुटाला चौपाटीवर दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना समोर आली आहे.

नागपूर, 24 जानेवारी :  देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर (Nagpur) शहरात फुटाला चौपाटीवर दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल हाणामारीची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नागपूर शहरात  फुटाला चौपाटीवर तरुण-तरुणींची नेहमी गर्दी असते. शनिवारी संध्याकाळी अचानक फुटाला चौपाटीच्या रस्त्यावर जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू आला. लोकांनी जाऊन पाहिले असता दोन तरुणींमध्ये जोरदार मारामारी सुरू होती. रस्त्याच्या कडेला दोन तरुणींमध्ये फ्री स्टाईल मारामारी सुरू होती. एक जण केसं ओरबाडत होती, तर दुसरी तरुणी चापटा लगावत होती. यावेळी एक तरुण सुद्धा तिथे उपस्थितीत होता. तो दोघींचे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण, दोन्ही तरुणी कुणाचेही ऐकायला तयार नव्हत्या. या दोन्ही तरुणीच्या भांडणाचे नेमकं कारण काय होते, हे मात्र अद्याप कळू शकले नाही. परंतु, प्रेम प्रकरणाच्या वादातून दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाली, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. नागपूरमध्ये या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे. याआधीही फुटाला चौपाटीवर तरुण आणि तरुणीच्या गटात मारहाणीची घटना घडली होती.
First published:

पुढील बातम्या