मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Viral Video : बनावट हाताला केलेला स्पर्शही जाणवू लागला; जादू आहे की, विज्ञानाचा खेळ?

Viral Video : बनावट हाताला केलेला स्पर्शही जाणवू लागला; जादू आहे की, विज्ञानाचा खेळ?

Video मध्ये पाहा हा अनोखा प्रयोग...

Video मध्ये पाहा हा अनोखा प्रयोग...

Video मध्ये पाहा हा अनोखा प्रयोग...

नवी दिल्ली, 11 जुलै : कल्पना करा, की कोणी आसपासच्या एखाद्या निर्जीव वस्तूला (Inanimate objects) स्पर्श केला आहे आणि तो स्पर्श (Touch) तुम्हाला जाणवला तर काय होईल? अर्थातच हा एक भयानक अनुभव असेल, कारण जोपर्यंत एखाद्या वस्तूचा आपल्या शरीराला स्पर्श होत नाही, तोपर्यंत आपल्याला काही जाणवत नाही. जेव्हा एखादी वस्तू त्वचेला स्पर्श करते, तेव्हा तिथल्या पेशी काही तरी स्पर्श जाणवत असल्याचा संदेश मेंदूपर्यंत पोहोचवतात; पण निर्जीव वस्तूंना स्पर्श केला आणि तो आपल्याला जाणवू लागला तर? नुकताच असा प्रकार एका व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसून आला आहे.

@TansuYegen या ट्विटर अकाउंटवर (Twitter Account) बऱ्याचदा आश्चर्यकारक गोष्टींचे व्हिडिओ शेअर केले जातात. सध्या या अकाउंटवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. त्यात एका व्यक्तीसमोर एका निर्जीव वस्तूला स्पर्श केला जात आहे; पण त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर होत आहे. म्हणजेच हा स्पर्श थेट त्याच्या शरीरालाच होत असल्याचा संकेत त्याच्या मेंदूकडून (Brain) दिला जात आहे.

बनावट हाताला स्पर्श केल्यानं वाटू लागलं खरं

व्हिडिओ पाहून तुम्हाला हा कदाचित चमत्कार वाटेल; पण प्रत्यक्षात हे फक्त विज्ञान आहे. व्हिडिओमध्ये एक डॉक्टर एका माणसाला त्याचे दोन्ही हात (Hand) टेबलावर ठेवायला लावतो; पण दोन्ही हातांमध्ये एक पुठ्ठा ठेवतो, जेणेकरून दुसरा हात नजरेआड होईल. मग तो दुसऱ्या हाताच्या जागी बनावट हात ठेवतो आणि तो त्याच्या शर्टखाली लपवून ठेवतो. तसंच एका हातापासून दूरवर ठेवलेला दुसरा खरा हातही झाकतो. त्यानंतर डॉक्टर त्या माणसाच्या खऱ्या आणि बनावट हाताला पट्टीने स्पर्श करतो. बनावट हाताला केलेला स्पर्शही मला जाणवतोय, असं त्या व्यक्तीला वाटू लागतं. जेव्हा डॉक्टर त्याच्या बनावट हातावर हातोडा मारू लागतात, तेव्हा ती व्यक्ती अचानक घाबरते आणि हात वर करण्याचा प्रयत्न करते.

स्पर्श जाणवण्यामागे काय आहे कारण?

व्हिडिओत डॉक्टर या विचित्र गोष्टीमागचं कारणही नमूद करतात. डॉक्टर सांगतात, त्याचा बनावट हात हा खरा हात आहे आणि ज्याप्रमाणे खऱ्या हाताला स्पर्श जाणवतो, तसाच स्पर्श बनावट हातालाही होतो, असं मानायला या व्यक्तीचा मेंदू भाग पाडत आहे. कारण त्याच्या डोळ्यासमोर बनावट हात आहे आणि शरीराला स्पर्शदेखील त्याच बाजूने जाणवतो आहे. व्हिडिओच्या शेवटच्या भागात, जेव्हा डॉक्टर हातोडा मारतात, तेव्हा तो माणूस त्याच्या लपवलेल्या खऱ्या हाताची बोटं वर करताना दिसतो. मेंदू आपल्याला स्पर्शाची जाणीव कशी करून देत असतो, हे हा मजेदार व्हिडिओ दर्शवतो. या व्हिडिओला आतापर्यंत 11 लाखांहून अधिक व्ह्यूज (Views) मिळाले आहेत. तसंच अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

First published:

Tags: Twitter, Twitter account, Viral video.